बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी (Actress) अभिनेत्री Priyanka Chopra पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2018 साली अमेरिकन गायक Nick Jonas याच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली आणि त्यावेळी त्यांच्या वयातील दहा वर्षांच्या फरकामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. अनेकांनी या नात्यावर टीका केली, तर काहींनी दोघांना ट्रोलही केले. मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत प्रियांका आणि निक यांनी आपला संसार पुढे नेला.

आता त्यांच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण झाली (Actress) असूनही घटस्फोटाच्या चर्चा वेळोवेळी सोशल मीडियावर डोके वर काढताना दिसतात. या अफवांवर आतापर्यंत दोघांनी फारशी प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र अलीकडील एका मुलाखतीत प्रियांकाने स्पष्ट शब्दांत ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. आमच्या नात्याला इतकी वर्ष झाली, तरी काही लोक अजूनही आमच्या विभक्त होण्याची वाट पाहत आहेत, हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. पण आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप आधीच थांबवले आहे, असे तिने सांगितले.

प्रियांकाने पुढे बोलताना असेही म्हटले की, आम्ही वेगवेगळ्या (Actress) देशांतील आहोत, आमचे धर्म वेगळे आहेत आणि आमच्या वयात अंतर आहे, कदाचित त्यामुळे लोकांना आमचे नाते खटकते. मात्र प्रेम, विश्वास आणि परस्पर सन्मान यावर आमचे नाते उभे आहे. बाहेर काय बोलले जाते यापेक्षा आम्ही एकमेकांसोबत कसे आहोत हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे ती म्हणाली.

2022 मध्ये या दांपत्याने त्यांच्या आयुष्यात मुलीचे (Actress) स्वागत केले. मालती मेरीच्या आगमनानंतर त्यांचे कुटुंब अधिक पूर्ण झाल्याचे प्रियांका अनेकदा सांगते. सततच्या अफवा आणि ट्रोलिंगनंतरही प्रियांका आणि निक यांचे नाते अधिक मजबूत होत असल्याचे ती ठामपणे सांगते. नात्याबाबत येणाऱ्या नकारात्मक चर्चांकडे दुर्लक्ष करणे आणि एकमेकांना प्राधान्य देणे, हेच त्यांच्या आनंदी संसाराचे गुपित असल्याचे प्रियांकाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?

बॉलिवूडचा सर्वात जास्त बोल्ड चित्रपट, पाहण्यासाठी थिएटर बाहेर रांगेत लागायचे लोक, ज्याने इंडस्ट्री हादरवली होती

या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार