बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव यांच्याबाबत (comedian) मोठी घडामोड समोर आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा देत 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चेक बाऊन्स प्रकरणात त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

राजपाल यादव हे 9 कोटी रुपयांच्या कर्जाशी (comedian) संबंधित चेक बाऊन्स प्रकरणात 5 फेब्रुवारी 2026 पासून तिहार जेलमध्ये होते. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी सरेंडर केले होते आणि त्यानंतर त्यांना कारागृहात पाठवण्यात आले होते. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलांनी तक्रारदाराच्या खात्यात सुमारे दीड कोटी रुपये हस्तांतरित केल्याचा युक्तिवाद केला. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी 2012 सालाशी जोडली गेली आहे. त्या वर्षी राजपाल यादव (comedian) यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या अता पता लापता या चित्रपटासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. चित्रपट अपयशी ठरल्यानंतर कर्जावरील व्याज आणि इतर देणी वाढत जाऊन एकूण रक्कम सुमारे 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. कर्जफेडीबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्याने न्यायालयाने त्यांना सरेंडर करण्याचे निर्देश दिले होते.

राजपाल यादव यांना अटक झाल्यानंतर (comedian) चित्रपटसृष्टीतूनही त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. सलमान खान, अजय देवगण आणि सोनू सूद यांसारख्या कलाकारांनी त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. सोशल मीडियावरही चाहत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता.
दरम्यान, अंतरिम जामीन मंजूर झाल्यामुळे राजपाल यादव यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी पुढील सुनावणीपर्यंत या प्रकरणावर सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या पुढील निर्णयानुसार या प्रकरणाची दिशा ठरणार आहे.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं