चित्रपटांमध्ये अनेकदा वर्षानुवर्षे हरवलेली माणसं अचानक भेटतात (reunited) आणि तो क्षण भावनांनी ओथंबून जातो. अशीच हृदयस्पर्शी घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे प्रत्यक्षात घडली. तब्बल 55 वर्षांनंतर दोन सख्खे भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकले आणि उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

ही कहाणी केरळमधील त्रिचूर जिल्ह्यातील एका व्यक्तीची आहे. अवघ्या 15 व्या वर्षी (reunited) घरातील वादातून रागाच्या भरात त्याने घर सोडले. त्यानंतर तो केरळमध्येच राहू लागला. मिळेल ते काम करत त्याने तब्बल 55 वर्षे काढली. विशेष म्हणजे, त्याने आपल्या कष्टाची कमाई स्वतःसाठी न वापरता ती अनाथाश्रमाला दान केली. परक्यांसाठी आयुष्य झोकून देणारा हा माणूस मात्र स्वतःच्या कुटुंबापासून दुरावलेलाच राहिला.

वय वाढत गेले तसे शरीर साथ देईनासे झाले. आपल्याला (reunited) सांभाळणारे कोणी नाही, ही जाणीव त्याला सतावत होती. अखेर नातेवाईकांना शोधण्याच्या आशेने तो रेल्वेने मुंबईकडे निघाला. मात्र प्रवासादरम्यान त्याच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. नातेवाईक आपल्याला स्वीकारतील का, या चिंतेतून नांदुरा रेल्वे स्थानकाजवळ त्याने धावत्या गाडीतून उडी मारली. तो रेल्वे ट्रॅकवर कोसळला आणि गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्याला (reunited) तातडीने रुग्णालयात दाखल केले. पाच दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीतून त्याची ओळख पटली आणि नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. रुग्णालयात जेव्हा त्याची आणि भावाची भेट झाली, तेव्हा तो क्षण अत्यंत भावनिक ठरला. 55 वर्षांनंतर पुन्हा भेटण्याची आशा जवळपास संपलेली असताना नियतीने दोघांना एकत्र आणले.
या घटनेमुळे परिसरातही मोठी चर्चा रंगली असून, आयुष्यभर परक्यांसाठी जगलेल्या या व्यक्तीला अखेर आपल्या माणसांचा आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा यांच्या उदयपूरमधील लग्नाच्या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे किती? किंमत ऐकून…

स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट

‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत