सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड्स व्हायरल होत असतात, पण सध्या चीनमधील (plastic eating) तरुणांमध्ये लोकप्रिय होत असलेला “प्लास्टिक ईटिंग” ट्रेंड चिंतेचा विषय ठरत आहे. TikTok, Douyin आणि इतर प्लॅटफॉर्मवर काही तरुण स्वतःचे असे व्हिडिओ शेअर करत आहेत ज्यामध्ये ते तोंडावर प्लास्टिक रॅप लावून त्याच्या आत अन्न ठेवतात, ते चावतात आणि नंतर ते अन्न थुंकून टाकतात. या प्रकारामागे कॅलरी न घेता भूक भागल्यासारखे वाटते, असा दावा काही जण करत आहेत.

मात्र आरोग्य तज्ज्ञांनी या ट्रेंडबाबत गंभीर (plastic eating) इशारा दिला आहे. त्यांच्या मते, प्लास्टिकमधील रसायनांचा थेट संपर्क शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो. अन्न आणि प्लास्टिक यांचा असा संपर्क झाल्यास सूक्ष्म प्लास्टिक कण शरीरात जाण्याची शक्यता असते. हे मायक्रोप्लास्टिक पचनसंस्थेत गेले तर पोटदुखी, गॅस, मळमळ यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात. शिवाय प्लास्टिकचे सूक्ष्म कण श्वासावाटे शरीरात गेल्यास श्वसनास अडथळा निर्माण होण्याचाही धोका आहे.

तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिकमध्ये आढळणारे बीपीए सारखे रसायन शरीरातील हार्मोन्सच्या (plastic eating) संतुलनावर परिणाम करू शकते. दीर्घकाळ असा संपर्क राहिल्यास यकृत आणि फुफ्फुसांवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुदमरल्याचा किंवा संसर्गाचा धोका देखील या प्रकारात संभवतो, त्यामुळे हा केवळ सोशल मीडियावरील प्रयोग नसून गंभीर आरोग्यविषयक धोका ठरू शकतो.
या ट्रेंडचा परिणाम फक्त शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. अन्नाबद्दल भीती किंवा अपराधीपणाची भावना निर्माण झाल्यास खाण्याशी नकारात्मक नातं तयार होऊ शकतं. वारंवार अन्न चावून थुंकण्याची सवय लागल्यास पुढे जाऊन ते इटिंग डिसऑर्डरचे रूप धारण करू शकते, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

वजन कमी करण्यासाठी हा उपाय प्रभावी (plastic eating) असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. उलट अशा पद्धतींमुळे भूक नियंत्रणात न राहता नंतर जास्त खाण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे दीर्घकाळात याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होऊ शकते, असे तज्ज्ञ स्पष्टपणे सांगतात.
सोशल मीडियावर अनेकांनी या ट्रेंडवर टीका करत तरुणांना अशा धोकादायक प्रयोगांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला हेच वजन नियंत्रणाचे सुरक्षित आणि परिणामकारक मार्ग असल्याचेही अधोरेखित करण्यात येत आहे.

हेही वाचा :

अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?

टीम इंडियाचा पहिला पराभव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी संधी गमावली, काय झालं?

एपस्टीन फाइल्स प्रकरणात सर्वात मोठी अटक! या दिग्गजावर कारवाई होताच जगात खळबळ