भारतामधील ट्रेन प्रवासादरम्यान एका विदेशी महिला पर्यटकाला आलेल्या भयानक (Foreign)अनुभवाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पोर्तुगालमधील सोलो ट्रॅव्हलर इनेस फारिया हिने हा व्हिडिओ शेअर करत तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, जोधपूरहून प्रवास करताना 3AC कोचमध्ये काही तरुणांनी तिला त्रास दिला. इतकंच नाही तर तिचा बाथरूमपर्यंत पाठलागही केला.इनेस फारिया तिच्या मैत्रिणीसोबत जोधपूरहून ट्रेनने प्रवास करत होती. तिच्या समोरच्या सीटवर बसलेले काही तरुण सतत तिच्याकडे पाहत असल्याचं तिने स्वतः शूट केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलंय. ती म्हणते, ‘सुरुवातीला मला अस्वस्थ वाटत होतं, पण जेव्हा ती मुलं फक्त मला बघण्यासाठी वारंवार त्यांची सीट बदलू लागले. तेव्हा मला जास्तच भीती वाटू लागली.’

फारियाने पुढे सांगितले की, त्या तरुणांच्या जवळून जाणं टाळण्यासाठी ती (Foreign) दुसऱ्या कोचमधील वॉशरूममध्ये गेली. मात्र काही सेकंदांतच एक तरुण तिच्या मागे बाथरूमपर्यंत आला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. ‘तो माझ्या मागेच बाथरूमपर्यंत आला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी मी खूप घाबरले होते,’ असं फारियाने व्हिडिओमध्ये म्हटलंय.फारियाच्या मैत्रिणीने त्या तरुणाला तिचा पाठलाग करताना पाहिलं आणि ती लगेच तिथे पोहोचली. त्यानंतर दोघींनी लगेच टीसीला या घटनेची माहिती दिली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही महिलांना 2AC कोचमध्ये हलवलं. त्यानंतर त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याचं सांगितलंय. आपल्या व्हिडिओमध्ये तिने मदत केल्याबद्दल रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभारही मानले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सने याबाबत संताप व्यक्त केला आहे. (Foreign)अनेकांनी अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीये. काही भारतीय महिलांनी कमेंट करत सांगितलं की, त्यांनाही सार्वजनिक ठिकाणी अशाच प्रकारच्या घटनांचा अनुभव आहे.इनेस फारियासोबत अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मुंबईतील धोबी घाट परिसरातही दोन तरुणांनी सेल्फीसाठी तिचा जवळपास 15 मिनिटं पाठलाग केला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तरुणांना अटक केली होती.

हेही वाचा :

राजकीय भूकंप! एकनाथ खडसेंची SIT चौकशी होणार; जाणून घ्या प्रकरण नेमकं आहे तरी काय?

धक्कादायक! दुबई विमानतळाजवळ ड्रोन हल्ला, एका भारतीयासह 4 जण जखमी

इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतातील साखर ‘कडू’; गुढीपाडव्याला साखर गाठी महाग? काय स्वस्त आणि कोणत्या वस्तू महागल्या?