मुंबईच्या गजबजाटापासून दूर, निसर्गाच्या कुशीत काही दिवस शांततेत घालवायचे (nature) असतील तर हे ठिकाण तुमच्यासाठी नक्कीच खास ठरू शकते. सध्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत असलेले हे निसर्गरम्य हिल स्टेशन परदेशी प्रवाशांनाही भुरळ घालत आहे. तिरुपतीपासून अवघ्या चार तासांच्या अंतरावर वसलेले हे ठिकाण एकदा भेट दिल्यानंतर पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल, असेच आहे.

कर्नाटकातील चिक्कबल्लापूर जिल्ह्यात (nature) वसलेले नंदी हिल स्टेशन हे राज्यातील अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. तिरुपतीपासून सुमारे 266 किलोमीटर अंतरावर असलेले नंदी हिल निसर्गप्रेमींसाठी स्वर्गसमान आहे. हिरवेगार डोंगर, दाट जंगल, शांत वातावरण आणि आल्हाददायक हवामान यामुळे हे ठिकाण वर्षभर पर्यटकांना आकर्षित करत असते.
नंदी हिलचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे अनुभवता येणारा ढगांमधील सूर्योदय. पहाटेच्या वेळी ढगांची चादर फाडत उगवणारा सूर्य पाहण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. हा नजारा पाहताना क्षणभर सगळे ताणतणाव विसरून जातात, असे अनेक पर्यटक सांगतात.
निसर्गसौंदर्यासोबतच साहसी उपक्रमांची (nature) आवड असणाऱ्यांसाठीही नंदी हिल एक उत्तम ठिकाण आहे. ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, सायकलिंग आणि पॅरासेलिंगसारख्या रोमांचक अनुभवांचा आनंद येथे घेता येतो. त्यामुळे शांतता आणि साहस यांचा अनोखा संगम नंदी हिल स्टेशनमध्ये अनुभवायला मिळतो.
जर तुम्ही कर्नाटक पर्यटनाचा विचार करत असाल, तर नंदी हिल स्टेशनचा समावेश तुमच्या प्रवास यादीत नक्कीच करा. निसर्गाच्या सान्निध्यात काही निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण एक परिपूर्ण पर्याय ठरू शकते.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी