टी20 वर्ल्डकप 2026 मधील सर्वाधिक चर्चेचा आणि हायव्होल्टेज मानला जाणारा भारत–पाकिस्तान (high-voltage match) सामना सध्या अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकला आहे. 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे हा सामना होणार असला, तरी पाकिस्तानने या सामन्याकडे पाठ फिरवल्याने क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. पाकिस्तान सरकारने आधीच भारताविरुद्ध सामना न खेळण्याची भूमिका जाहीर केली असून, त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत सामना होणार की नाही, याबाबत सस्पेन्स कायम आहे.

दुसरीकडे, भारतीय संघ मात्र नियोजित कार्यक्रमानुसार (high-voltage match) श्रीलंकेत दाखल होणार आहे. याआधी आशिया कपमध्येही पाकिस्तानने अशाच प्रकारची भूमिका घेतली होती. अनेक तास हॉटेलमध्ये थांबल्यानंतर अखेर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचा अनुभव असल्याने, यावेळीही शेवटच्या क्षणी चित्र बदलू शकते, अशी चर्चा आहे. सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसी यांच्यात या प्रकरणावर जोरदार खलबतं सुरू असून, त्यात आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचाही सक्रिय सहभाग दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, (high-voltage match) बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याशी थेट चर्चा केली आहे. लाहोरमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत त्यांनी पाकिस्तानने टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारताविरुद्धचा सामना खेळावा, अशी विनंती केली. या बैठकीला आयसीसीचे उपाध्यक्ष इमरान ख्वाजा देखील उपस्थित होते. बांग्लादेशच्या या मध्यस्थीमुळे पाकिस्तान आपली भूमिका मवाळ करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खरंतर, बांग्लादेशला या स्पर्धेतून (high-voltage match) वगळल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक भूमिका घेत भारताविरुद्ध सामना खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र भारत–पाकिस्तान वाद अधिक चिघळू नये आणि स्पर्धेची प्रतिष्ठा टिकून राहावी, यासाठी बांग्लादेशने पुढाकार घेतल्याचं मानलं जात आहे. त्यांच्या विनंतीमुळे पाकिस्तानचा रोष काहीसा कमी होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार पाकिस्तानने या संपूर्ण वादात आपला (high-voltage match) फायदा करून घेण्याचा प्रयत्न केल्याचंही बोललं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत–पाकिस्तान द्विपक्षीय मालिका बंद असल्याने पीसीबीला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आयसीसीसमोर काही अटी ठेवल्याची चर्चा आहे. आयसीसीकडून अधिक मानधन मिळावं, भारत–पाकिस्तान द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू व्हाव्यात आणि टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारतीय खेळाडूंनी हँडशेक करावा, अशा अटी पाकिस्तानने मांडल्याचं सांगितलं जात आहे.
आता बांग्लादेशच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तान आपली भूमिका बदलतो का, की वाद आणखी वाढतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. क्रिकेटप्रेमी मात्र भारत–पाकिस्तान सामना होईल या आशेवर अजूनही डोळे लावून बसले आहेत.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी