टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये भारताने विजयी सलामी देत आपला पहिला सामना (T20 World Cup) अमेरिकेविरुद्ध जिंकला. या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला असला, तरी या सामन्यात युवा सलामीवीर अभिषेक शर्माची कामगिरी निराशाजनक ठरली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला आणि त्यामुळे क्षणभर भारतीय चाहत्यांना धक्का बसला. अमेरिकेचा वेगवान गोलंदाज अली खान याने अभिषेकला पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवत सामना गाजवला.
मात्र अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला तरी चाहत्यांमध्ये फारशी नाराजी दिसून आली नाही. आक्रमक फलंदाजी हीच त्याची ओळख असल्याने तो अशा जोखमी घेतच खेळतो, हे क्रीडाप्रेमींना ठाऊक आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष नामिबियाविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्याकडे लागले आहे. त्या सामन्यात अभिषेक मोठी खेळी करेल आणि एकहाती सामना फिरवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सामन्याआधीच अभिषेक शर्माचा एक टॅटू (T20 World Cup) सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने आपल्या उजव्या हातावर “IT WILL HAPPEN” असा मेसेज गोंदवला आहे. या वाक्यातून ठाम आत्मविश्वास आणि कोणतीही गोष्ट साध्य करण्याचा निर्धार दिसून येतो. टी20 वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर हा टॅटू पाहिला जात असून, या स्पर्धेत स्वतःची छाप पाडण्याचा संदेश तो देत असल्याचा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे.
अभिषेक शर्माने या टॅटूच्या अर्थाबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नसल्यामुळे नेटकरी आपल्या पद्धतीने त्याचा अर्थ लावत आहेत. अनेकांच्या मते, या वर्ल्डकपमध्ये त्याची बॅट तळपावी, मोठी खेळी व्हावी आणि भारताने पुन्हा एकदा टी20 वर्ल्डकप जिंकावा, अशी त्याची मनोमन इच्छा असावी.

अभिषेक यापूर्वीही आपल्या अनोख्या सेलिब्रेशनमुळे (T20 World Cup) चर्चेत आला होता. आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सविरुद्ध वादळी शतक ठोकल्यानंतर त्याने “हे ऑरेंज आर्मीसाठी आहे” असा मजकूर असलेली चिठ्ठी दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या सामन्यात त्याने 55 चेंडूत 10 षटकारांसह 141 धावा करत जबरदस्त खेळी साकारली होती.
आता हातावर गोंदवलेल्या या नव्या मेसेजसोबत अभिषेक शर्मा पुढील सामन्यात काय कमाल करतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. नामिबियाविरुद्ध शतकी खेळी करत तो पुन्हा एकदा आपल्या बॅटमधूनच उत्तर देईल, असा विश्वास अनेक क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी