बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अभिषेक बच्चन (Bollywood actor) याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला. 2007 मध्ये अभिषेक बच्चन याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केले. मात्र, मागील काही दिवस दोघांचा घटस्फोट होणार असल्याची सातत्याने चर्चा रंगताना दिसली. यादरम्यानच अभिषेक बच्चन याने स्पष्ट केले की, घटस्फोटाची चर्चा ही फक्त आणि फक्त अफवाच आहे. अभिषेक बच्चन त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच अभिषेकने मोठा खुलासा केला. अभिषेक बच्चन याने स्पष्ट केले की, त्याला व्यवसायाची खूप जास्त आवड आहे. त्याने अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अभिषेक बच्चन याने पहिल्यांदाच आपल्या गुंतवणुकीबद्दल खुलासा केल्याचे बघायला मिळाले. शिवाय त्याने सांगितले की, ठाण्यातील एक प्रसिद्ध मिसळ असून तो तीच मिसळ दररोजच्या नाश्त्यात खातो.

ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना अभिषेक बच्चन (Bollywood actor) याने म्हटले की, 2019 मध्ये लाँच झालेल्या इंडियन हॉट सॉस नागिनमध्ये त्याने गुंतवणूक केली. त्याने म्हटले मी ज्यावेळी हा सॉस खाल्ला त्यावेळी मला त्याची टेस्ट समजली. मला सहज हो सॉस टेस्ट करण्यास मिळाला आणि मला तो खूप आवडला. मी त्यात गुंतवणूक केली. मी अगोदर हा सॉस खूप जास्त वापरला आणि त्यानंतर मी त्याच्या उत्पादकांसोबत संपर्क साधला.
मी तुमच्यात भागीदार होऊ शकतो का? हा प्रश्न मी त्यांना संपर्क (Bollywood actor) साधून विचारले ते देखील त्यावेळी गुंतवणुकदाराच्या शोधातच होते. स्विगी आणि झेप्टो या कंपन्यातही आपली गुंतवणूक असल्याचे अभिषेक बच्चनने म्हटले. यादरम्यान अभिषेक बच्चन याने स्पष्ट केले की, स्विगीमधील त्याची गुंतवणूक ही त्याच्या मिसळ प्रेमामुळे झाली.
अभिषेक बच्चन याने म्हटले की, जगातील सर्वात भारी (Bollywood actor) आणि जबरदस्त मिसळ पाव ठाण्यात मिळतो. ठाण्यातील मिसळ त्याचा दररोजचा सकाळचा नाश्ता आहे. विशेष म्हणजे तो ही मिसळ स्विगीच्या माध्यमातून ऑर्डर करतो. या मिसळच्या प्रेमातूनच त्याने स्विगीमध्ये मोठी गुंतवणूक केली. अभिषेक बच्चन याने पहिल्यांदाच त्याच्या गुंतवणुकीबद्दल खुलासा केला. अभिषेकने हे देखील स्पष्ट केले की, त्याने मुंबईत आतापर्यंत ₹219 कोटींची गुंतवणूक केली.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली