भारत-पाकिस्तान सामन्यात भारताच्या दमदार विजयाचा नायक ठरला तो Ishan Kishan. त्याच्या (aggressive batting) आक्रमक फलंदाजीने पाकिस्तानी गोलंदाज पूर्णपणे गोंधळून गेले. अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी करत त्याने सामन्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, मैदानावरील रिकाम्या जागा अचूक हेरत त्याने चौफेर फटकेबाजी केली आणि विरोधी संघाची लय बिघडवली.

डावखुरा आक्रमक फलंदाज अशी ओळख असलेल्या इशानचा (aggressive batting) जन्म पाटण्यात झाला असला तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडकडून आपली छाप पाडली. लहान वयातच त्याने आपल्या खेळीत सातत्य दाखवत भारतीय संघात स्थान मिळवले. त्याच्या निर्भीड शैलीमुळे तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेष प्रभावी ठरतो.
मैदानावर धावांचा पाऊस पाडणारा इशान (aggressive batting) कमाईच्या बाबतीतही मागे नाही. क्रिकेटमधील मानधन, आयपीएल करार आणि विविध ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून त्याने कोट्यवधींची संपत्ती उभी केली आहे. ‘क्रिक ट्रॅकर’च्या अहवालानुसार त्याची एकूण संपत्ती अंदाजे 7 मिलियन डॉलर, म्हणजेच सुमारे 63 कोटी रुपयांच्या आसपास आहे. या रकमेतील मोठा वाटा त्याच्या आयपीएल आणि जाहिरातींमधील उत्पन्नाचा आहे.
इशानचे आयपीएल करिअरही तितकेच (aggressive batting) गाजलेले आहे. 2016 मध्ये Gujarat Lions संघाने त्याला 35 लाख रुपयांत आपल्या ताफ्यात सामील केले होते. त्यानंतर त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत स्वतःची किंमत वाढवली. आयपीएल 2025 च्या लिलावात Sunrisers Hyderabad संघाने त्याला तब्बल 11.25 कोटी रुपयांत खरेदी केले, जे त्याच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि गुणवत्तेचे प्रतीक मानले जाते.
सध्या इशान किशन केवळ भारताच्या विजयाचा शिल्पकार नाही, तर तरुण क्रिकेटपटूंकरिता प्रेरणास्थानही ठरत आहे. मैदानावरील आक्रमकता आणि मैदानाबाहेरील यश या दोन्ही बाबतीत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली