मुलीच्या लग्नाचा आनंदोत्सव साजरा करण्याची स्वप्नं डोळ्यांत साठवून (incident) प्रत्येक वडील आयुष्यभर कष्ट करत असतो. पण महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका अंतर्गत पांगरी नवघरे येथे घडलेली घटना मन सुन्न करणारी आहे. आर्थिक अडचणींना कंटाळून एका शेतकरी पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पांगरी नवघरे येथील शेतकरी राजू (incident) कालापाड यांच्या मुलीचे लग्न १४ मार्च रोजी ठरले होते. लग्नाच्या तयारीला घरात सुरुवात झाली होती. बस्त्याच्या खरेदीसाठी आजचा दिवस ठरला होता आणि नातेवाईकही घरी जमले होते. मात्र पैशांची जुळवाजुळव न झाल्याने राजू कालापाड प्रचंड तणावाखाली होते. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, सकाळी ते शेतात गेले आणि तेथे झाडाला दोरी बांधून गळफास घेत त्यांनी आपले जीवन संपवले.

राजू कालापाड यांच्याकडे अवघी एक एकर शेती होती. गेल्या काही वर्षांत शेतीत (incident) अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत गेला. कर्जफेड आणि संसाराचा गाडा ओढण्यासाठी ते पत्नीसमवेत पुण्यात जाऊन मोलमजुरी करत होते. मुलीच्या लग्नासाठी थोडीफार रक्कम जमवून ते काही दिवसांपूर्वी गावी परतले होते. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.

राजू यांना एक मुलगी आणि दोन लहान मुले (incident) आहेत. लग्नाला अवघा एक महिना बाकी असताना पित्याने टोकाचे पाऊल उचलल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. लग्नाच्या तयारीत असलेल्या घरात अचानक पित्याचा मृतदेह आल्याने मुलगी आणि नातेवाईकांचा आक्रोश उसळला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, आर्थिक विवंचना आणि मुलीच्या लग्नाचा खर्च उचलता न आल्याने शेतकऱ्यांकडून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले जाण्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा :

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा यांच्या उदयपूरमधील लग्नाच्या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे किती? किंमत ऐकून…

स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट

‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत