बांगलादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या १३व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Bangladesh) स्पष्ट झाला असून देशात सत्तांतराची नांदी झाली आहे. तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी ने या निवडणुकीत दणदणीत यश मिळवत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली असून तारिक रहमान लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. शपथविधीची तारीख जाहीर होण्याची आता औपचारिकता बाकी आहे.

या निवडणुकीत एक वेगळीच घटना घडल्याने राजकीय (Bangladesh) वर्तुळात चर्चा रंगली आहे. ‘बीजेपी’ नावाच्या पक्षाने एक जागा जिंकली असली तरी हा पक्ष भारतातील भारतीय जनता पार्टी नसून बांगलादेशमधील बांग्लादेश जातीय पार्टी आहे. इंग्रजीत Bangladesh Jatiya Party असा उल्लेख असलेल्या या पक्षाचा शॉर्टफॉर्म BJP असा होत असल्याने सुरुवातीला अनेकांना संभ्रम निर्माण झाला. या निवडणुकीत हा पक्ष बीएनपीचा मित्रपक्ष म्हणून मैदानात उतरला होता.
भेला लोकसभा मतदारसंघातून बीजेपीचे उमेदवार (Bangladesh) अंदलीव रहमान यांनी १,०५,५४३ मते मिळवत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात उभे असलेल्या जमात-ए-इस्लामी पक्षाचे उमेदवार मोहम्मद नज़रुल इस्लाम यांना ७५,३३७ मते मिळाली. अंदलीव रहमान यांच्या विजयामुळे बीजेपीने संसदेत आपले खाते उघडले असून आघाडी सरकारमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, बीएनपी सत्तेत येताच पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने (Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. भारतात असलेल्या शेख हसिना यांना बांगलादेशात परत आणण्यासाठी भारतावर दबाव टाकू, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यापूर्वीच्या काळजीवाहू सरकारनेही अशीच मागणी केली होती. त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेनंतर भारत-बांगलादेश संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. नव्या सत्तांतरानंतर दोन्ही देशांमधील राजनैतिक समीकरणे कशी बदलतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?
या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार