जानेवारी ते डिसेंबर या वर्षातील बहुतांश महिन्यांमध्ये 30 किंवा 31 दिवस असतात, पण फेब्रुवारी (February) मात्र फक्त 28 दिवसांचा का असतो, हा प्रश्न अनेकांना पडतो. ही केवळ गणिती किंवा वैज्ञानिक बाब नसून तिच्या मागे प्राचीन इतिहास, परंपरा आणि राजकीय निर्णयांचा मोठा प्रभाव आहे. आज आपण वापरत असलेले ग्रेगोरियन कॅलेंडर हे हजारो वर्षांच्या बदलांचा परिणाम आहे.

प्राचीन रोममध्ये सुरुवातीला कॅलेंडर चंद्राच्या हालचालीवर (February) आधारित होते. त्या वेळी वर्षात फक्त दहा महिने मोजले जात आणि ते मार्चपासून डिसेंबरपर्यंत असत. हिवाळ्याच्या काळातील दिवस स्वतंत्र महिन्यांत गणले जात नसत. नंतर रोमन राजा Numa Pompilius याने वर्ष पूर्ण करण्यासाठी जानेवारी आणि फेब्रुवारी हे दोन महिने जोडले. मात्र महिन्यांचे दिवस ठरवताना एक वेगळीच अडचण निर्माण झाली. रोमन समाजात सम संख्या अशुभ मानली जात असल्याने बहुतांश महिन्यांना 29 किंवा 31 दिवस देण्यात आले.

वर्षातील एकूण दिवसांची मांडणी करताना शेवटी फेब्रुवारीकडेच उरलेले दिवस आले आणि तो 28 दिवसांचा ठेवण्यात आला. विशेष म्हणजे फेब्रुवारी हा मृतांच्या स्मरणाशी संबंधित धार्मिक विधींचा महिना मानला जात होता, त्यामुळे तो इतर महिन्यांपेक्षा लहान ठेवण्यात आल्याचे मानले जाते.

यानंतर Julius Caesar सत्तेवर आला आणि त्याने चंद्रावर (February) आधारित पद्धतीऐवजी सौर गणनेवर आधारित ‘ज्युलियन कॅलेंडर’ लागू केले. या बदलामुळे वर्ष अधिक अचूक झाले, पण फेब्रुवारीचे 28 दिवस कायम ठेवले गेले. पृथ्वीला सूर्याभोवती पूर्ण फेरी मारण्यासाठी लागणारा अतिरिक्त कालावधी समायोजित करण्यासाठी दर चार वर्षांनी एक दिवस वाढवून ‘लीप वर्ष’ संकल्पना सुरू करण्यात आली, ज्यामुळे त्या वर्षी फेब्रुवारी 29 दिवसांचा होतो.यानंतर 1582 साली Pope Gregory XIII यांनी कॅलेंडरमध्ये सुधारणा करून ‘ग्रेगोरियन कॅलेंडर’ लागू केले. हेच कॅलेंडर आज जगभर वापरले जाते. विज्ञान, परंपरा आणि मानवी निर्णय यांच्या संगमातून तयार झालेल्या या कालगणनेत फेब्रुवारी आजही सर्वात लहान महिना म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं