पृथ्वीवर अनेक रहस्यमय आणि थक्क करणाऱ्या गोष्टी आहेत. समुद्रातील जीवसृष्टी (Marine life) तर अधिकच अद्भुत मानली जाते. अथांग सागराच्या गाभाऱ्यात अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. त्यापैकीच एक म्हणजे Beluga sturgeon हा मासा. या माशाच्या अंड्यांची किंमत इतकी प्रचंड आहे की ऐकूनच अनेकांच्या भुवया उंचावतात.
बेलुगा स्टर्जनच्या अंड्यांपासून तयार होणाऱ्या केव्हियारला जगभरात मोठी मागणी आहे. विशेषतः ‘अल्मास’ नावाने ओळखला जाणारा हा केव्हियार अत्यंत लक्झरी खाद्यपदार्थ मानला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंड्यांची किंमत तब्बल २५ ते ३० लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाते. त्यामुळे हा पदार्थ श्रीमंत आणि उच्चभ्रू वर्गामध्ये प्रतिष्ठेचे प्रतीक मानला जातो.

स्टर्जन प्रजातीतील अल्बिनो बेलुगा स्टर्जन ही जात तर अधिकच (Marine life) दुर्मिळ आहे. ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्यामुळे तिच्या अंड्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या माशांचे आयुष्य खूप मोठे असते आणि त्यांना प्रजननक्षम होण्यासाठी साधारण २० ते १०० वर्षांचा कालावधी लागू शकतो. इतक्या दीर्घ काळ देखभाल करावी लागते, त्यामुळे उत्पादन मर्यादित राहते आणि किंमत आकाशाला भिडते.
अल्मास केव्हियार तयार करण्याची प्रक्रिया देखील अत्यंत बारकाईने आणि हाताने केली जाते. दर्जा, चव आणि शुद्धता टिकवण्यासाठी विशेष कौशल्याची गरज असते. काही वेळा हा सर्वाधिक महाग केव्हियार २४ कॅरेट सोन्याच्या पत्र्याने मढवलेल्या डब्यांमध्ये पॅक करून विकला जातो. त्यामुळे हा पदार्थ केवळ खाद्यपदार्थ न राहता ऐश्वर्य आणि वैभवाचे प्रतीक बनला आहे.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली