बिहारच्या बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील मोती बिगहा गावात (heartbreaking incident) घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. विषाची चव कशी असते हे जाणून घेण्याच्या कुतूहलातून पाच अल्पवयीन मुलींनी विषारी पदार्थाचे सेवन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेत चार मुलींचा मृत्यू झाला असून एक मुलगी सुदैवाने बचावली आहे. तिच्या जबाबानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती उघड झाली आहे.

घटना 29 जानेवारी रोजी घडली. गावातील पाच मैत्रिणी शेताच्या (heartbreaking incident) दिशेने गेल्या होत्या. काही वेळानंतर त्यापैकी एकच मुलगी घरी परतली, तर उर्वरित चार मुली बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. स्थानिकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत मुलींचे वय 12 ते 15 वर्षांच्या दरम्यान होते.
वाचलेल्या 14 वर्षीय मुलीने पोलिसांना सांगितले की, त्या सर्व जणी एका एकांत जागी गेल्या होत्या. त्यांच्यापैकी एका मैत्रिणीने बगळे किंवा इतर पक्षी मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी पदार्थाबद्दल सांगितले आणि तो खाऊन पाहण्याचा प्रस्ताव ठेवला. “चल, हे खाऊया आणि पाहूया आपण जिवंत राहतो की मरतो,” असे म्हणत त्यांनी तो पदार्थ पाण्यासोबत घेतला. वाचलेल्या मुलीने सांगितले की तिने अत्यंत कमी प्रमाणात तो पदार्थ घेतला आणि लगेच थुंकून टाकला, त्यामुळे तिचा जीव वाचला. इतर चार मुली काही क्षणांतच कोसळल्या.

घाबरलेल्या अवस्थेत ती मुलगी घरी पोहोचली (heartbreaking incident) आणि कुटुंबियांना सर्व प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तातडीने तिला घरगुती उपाय म्हणून कडुलिंबाचे पाणी पाजले आणि नंतर वैद्यकीय उपचारासाठी नेले. योग्य वेळी उपचार मिळाल्यामुळे तिची प्रकृती स्थिर आहे.
या प्रकरणी दाउदनगरचे एसडीपीओ अशोक कुमार दास यांनी सांगितले की प्राथमिक चौकशीत काही वेगळे पैलू समोर आले आहेत. सरस्वती पूजेच्या सायंकाळी काही मुलांबरोबर फिरताना मुलींना पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना ओरडल्याची माहिती आहे. त्या रागाच्या भरात मुलींनी टोकाचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र मृत मुलींपैकी एका मुलीच्या वडिलांनी हा दावा फेटाळून लावला असून, संपूर्ण तपास निष्पक्षपणे व्हावा अशी मागणी केली आहे.

चारही मुलींच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली. नातेवाईकांनी (heartbreaking incident) चारही मुलींचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार केले. पोलिसांनी वाचलेल्या मुलीचा अधिकृत जबाब नोंदवला असून विषारी पदार्थाचा स्रोत, मुलींचा हेतू आणि इतर संभाव्य कारणांचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेने अल्पवयीन मुलांमध्ये वाढत चाललेल्या धोकादायक कुतूहल आणि मानसिक ताणतणावाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा :

घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?

बॉलिवूडचा सर्वात जास्त बोल्ड चित्रपट, पाहण्यासाठी थिएटर बाहेर रांगेत लागायचे लोक, ज्याने इंडस्ट्री हादरवली होती

या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार