तुरुंगात एक रात्र काढणे म्हणजे धाडसाची गोष्ट मानली जाते. कठोर सुरक्षा, गुन्हेगारांचा इतिहास (prison) आणि भीतीदायक वातावरण यामुळे तुरुंगाचे नाव घेताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. पण ऑस्ट्रेलियातील एका कुप्रसिद्ध तुरुंगाचे रूपांतर आज आलिशान हॉटेलमध्ये झाले असून, येथे एक रात्र घालवण्यासाठी लोक हजारो रुपये मोजण्यास तयार असतात.HM Prison Pentridge हा तुरुंग एकेकाळी ऑस्ट्रेलियातील सर्वात कुख्यात कारागृहांपैकी एक मानला जात होता. 1851 ते 1997 या कालावधीत तो कार्यरत होता. मेलबर्नपासून सुमारे 8 किमी अंतरावर असलेल्या कोबर्ग परिसरात 140 एकरांवर पसरलेला हा व्हिक्टोरिया राज्यातील 19व्या शतकातील सर्वात मोठ्या तुरुंगांपैकी एक होता. येथे अनेक धोकादायक गुन्हेगारांना ठेवण्यात आले होते. त्यात ऑस्ट्रेलियातील शेवटचा फाशी गेलेला कैदी Ronald Joseph Ryan याचाही समावेश होता. तसेच कुप्रसिद्ध गुन्हेगार Mark ‘Chopper’ Read यानेही येथे शिक्षा भोगली होती.

आज मात्र या ऐतिहासिक तुरुंगाचे रूपांतर फाइव्ह स्टार दर्जाच्या (prison) हॉटेलमध्ये झाले आहे. जुन्या दगडी भिंती, जाड निळसर दगडांचा वापर आणि घुमटाकार छत यामुळे तुरुंगाचा मूळ हेरिटेज लूक कायम ठेवण्यात आला आहे, मात्र आतमध्ये अत्याधुनिक आणि लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत. पाहुण्यांना पूर्वी कैद्यांनी वापरलेल्या सेल्समध्येच राहण्याची संधी मिळते. या खोल्यांना आतून एकत्र करून सुमारे 19 आलिशान स्युइट्स तयार करण्यात आल्या आहेत.येथे एका रात्रीसाठी सुमारे AU$449 म्हणजेच अंदाजे 28 हजार रुपये खर्च करावे लागतात. हॉटेलमध्ये प्रीमियम मिनीबार, आधुनिक बाथरूम, उच्च दर्जाचे हेअर आणि स्किनकेअर प्रॉडक्ट्स अशा सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, तुरुंगाच्या मूळ रचनेला धक्का न लावता या संकुलात एक आलिशान अंडरग्राऊंड भागही विकसित करण्यात आला आहे, ज्यासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ लागला.
व्हिक्टोरिया राज्य सरकारने 1997 मध्ये हा तुरुंग (prison) बंद करून खाजगी विकसकांना विकला. त्यानंतर पुनर्विकासाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 2023 मध्ये हे हॉटेल सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. आज येथे पर्यटक केवळ लक्झरी अनुभवासाठीच नव्हे, तर इतिहासाच्या सावल्यांमध्ये एक वेगळी रात्र घालवण्याच्या आकर्षणासाठीही येतात. भीती आणि ऐतिहासिक वारसा यांचा संगम असलेले हे ठिकाण आता ऑस्ट्रेलियातील एक अनोखे पर्यटनस्थळ बनले आहे.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?