राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार (political) गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात जळगावच्या सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक तसेच गृहमंत्री यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरत अरेरावी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला पोलीस अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे. सावदा पोलीस स्टेशनमध्ये एका गौण खनिज चोरीच्य प्रकरणात पोलिसांना जाब विचारताना एकनाथ खडसेंनी अर्वाच्च शब्दात अरेरावी केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दुसरीकडे या संदर्भात फोनवरून माहिती देताना एकनाथ खडसेंकडून त्यांच्याविरोधात तक्रारीत केलेल्या आरोपांचे खंडन करण्यात आले आहे.

एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत, एकनाथ खडसे (political) यांच्याविरोधात जळगावच्या सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक तसेच गृहमंत्री यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरत अरेरावी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मात्र एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ‘गौण खनिज प्रकरणात चौकशीसाठी सावदा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, मात्र त्यावेळी माझ्याकडून एक चुकीचा शब्द निघाल्याने पोलीस निरीक्षकाची आपण माफी मागितल्याची माहिती एकना खडसे यांनी फोनद्वारे दिली आहे.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी