मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्या सहजसुंदर (Marathi entertainment) अभिनयामुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिका असो वा चित्रपट, विविधांगी भूमिका साकारत तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबरच प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते आणि तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते.

मात्र अनेकांना माहिती नसेल की, गजबजलेल्या (Marathi entertainment) मुंबईपासून दूर जाऊन प्रार्थनाने निवांत जीवनशैलीचा मार्ग स्वीकारला आहे. काही वर्षांपूर्वीच प्रार्थना आपल्या पतीसोबत मुंबई सोडून अलिबागला स्थायिक झाली आहे. नुकत्याच दिलेल्या एका दिलखुलास मुलाखतीत तिने हा महत्त्वाचा निर्णय का घेतला, यामागचं कारण उघड केलं आहे.
प्रार्थनाने सांगितलं की, कोव्हिडनंतर तिच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला. या काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे कामाच्या धावपळीत आपण जगणंच विसरून जातो. आयुष्यात केवळ यशच नाही, तर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असं तिला वाटू लागलं.

मुंबईत राहत असताना दोघांच्याही (Marathi entertainment) कामाच्या वेळा प्रचंड ताणतणावाच्या होत्या. तिचा नवरा सकाळी आठ वाजता घराबाहेर पडायचा आणि रात्री उशिरा, जवळपास बारा वाजता परतायचा. प्रार्थनाही शूटिंग संपवून उशिराच घरी येत असे. त्यामुळे एकमेकांसोबत शांतपणे वेळ घालवणं जवळपास अशक्य झालं होतं.
याच कारणामुळे त्यांनी आयुष्याला थोडा ब्रेक देत काम आणि वैयक्तिक जीवनाचं संतुलन साधण्याचा निर्णय घेतला. सध्या काम असताना ते मुंबईत चार दिवस राहतात आणि सर्व शेड्युल पूर्ण करतात. त्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस ते अलिबागला घालवतात. या काळात कामापेक्षा कुटुंबालाच प्राधान्य देण्याचा त्यांचा ठाम निर्णय आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात, शांत वातावरणात राहून आयुष्य अधिक अर्थपूर्ण पद्धतीने जगता येतं, असं प्रार्थनाला वाटतं. कामात व्यस्त असूनही स्वतःसाठी आणि नात्यांसाठी वेळ काढता येतो, हेच तिच्या या निर्णयातून दिसून येतं.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी