राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात (marriage) लग्न 19 ते 25 वय असताना करावे आणि जोडप्याला तीन मुले असावीत. यामुळे पालकांचे आणि कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते असं विधान केले होते. यानंतर आता असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमच्या नेत्याने लोकसंख्यवाढीबाबत अजब नारा दिला आहे. उत्तर प्रदेशचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी मुरादाबाद येथील एका सभेत बोलताना “हम दो, हमारे दो दर्जन” ही घोषणा दिली. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण देशात वाद निर्माण झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शौकत अली यांनी मुरादाबाद येथील (marriage) सभेत “हम दो, हमारे दो दर्जन” ही घोषणा दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, मला आठ मुले आहेत, आणि माझ्या मोठ्या भावाला 16 मुले आहेत. आम्ही सर्व मुस्लिमांना शक्य तितकी मुले जन्माला घालण्यास उद्युक्त करू. अल्लाह देत असल्याने, घेत राहा. जोपर्यंत तो देत राहतो तोपर्यंत घेत राहा. देशातील काही लोकांना काळजी आहे की आपली लोकसंख्या वाढत आहे, परंतु जर लोकसंख्या वाढली तर देश अधिक मजबूत होईल.’

शौकत अली यांनी भारताची तुलना (marriage) चीनशी केली. ते म्हणाले की, “चीनची लोकसंख्या जास्त आहे आणि ती बलवान आहे. म्हणून, जर आपली लोकसंख्या वाढली तर आपला देश बलवान होईल. ‘आम्ही दोन, आमचे दोन डझन,’ लोकांना आपल्या लोकसंख्येची समस्या का आहे? लोकांना आपल्या संख्येची काळजी का वाटते? जे लग्न करत नाहीत तेच हिंदू बांधवांना चार मुले असावीत असा सल्ला देतात. आम्ही म्हणतो, हिंदू बांधवांना चार नाही तर चौदा मुले असावीत, जेणेकरून देश बलवान होईल.”

पुढे त्यांनी मॉब लिंचिंग आणि मुस्लिमांच्या (marriage) छळावर भाष्य केले. अली म्हणाले की, “हिंदू संघटनांशी संबंधित महिलांनीही मुस्लिमांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली आहे. आमच्या मदरशांना दहशतवादाचे अड्डे म्हटले जात आहे. आमच्या मुलींचे हिजाब सार्वजनिक ठिकाणी काढून टाकले जात आहेत. आमची दाढी उपटली जात आहे. लोक सुरक्षित नाहीत.”

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी