नवी मुंबईतील भूखंडांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा (targeted) तापले आहे. मंत्री गणेश नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधत नगरविकास खात्याच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. सिडको आणि एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेला विकासासाठी देण्यात येणारे भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप करत त्यांनी आपल्या मंत्रिपदाबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जनतेच्या हितासाठी भूखंड तात्काळ देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा मंत्रिपदाचा काय उपयोग असा सवालही त्यांनी केला होता.

नाईक यांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ (targeted) उडाली. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांनी नाईक यांच्यावर जोरदार पलटवार करत त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर थोडक्यात प्रतिक्रिया दिली. गणेश नाईक यांना काल डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले असल्याचे सांगत त्यांनी अधिक भाष्य टाळले. तसेच आपण कोणावर बोलतो आहोत आणि त्यांचा नेमका काय प्रश्न आहे हे समजून घेतले पाहिजे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. काही लोकांना एका प्रकारची आसूया असल्याचा टोला त्यांनी लगावला.

शाखाप्रमुख पदापासून सुरू झालेला आपला राजकीय प्रवास (targeted) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला, मात्र काही जण अजूनही त्याच ठिकाणी आहेत, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाईक यांच्यावर निशाणा साधला. 2022 मधील उठावाचा उल्लेख करत त्या घटनेनंतरच काहींना मंत्रिपदे मिळाल्याचा दावा त्यांनी केला. आपण टीकेला उत्तर देत बसत नाही, कामातूनच उत्तर देतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले असून नवी मुंबईतील विकासकामे आणि भूखंडांचे वाटप हा मुद्दा पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं