संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता (death case) न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला आहे. सत्र न्यायालयाने या प्रकरणातील सहाही आरोपींवर आरोप निश्चित केले असून 23 फेब्रुवारीपासून नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या संवेदनशील प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
भुकूम येथे 16 मे रोजी वैष्णवीचा मृतदेह सासरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला आत्महत्येची शक्यता व्यक्त करण्यात आली होती; मात्र शवविच्छेदन अहवालात शरीरावर जखमांच्या खुणा असल्याचे नमूद झाल्याने संशय अधिक गडद झाला.

या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. हगवणे (death case) कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती देत वैष्णवीचे पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, दीर सुशील हगवणे आणि कुटुंबीय मित्र निलेश चव्हाण यांना अटक केली.
आरोपींवर हुंडाबळी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, शारीरिक व मानसिक छळ, कट रचणे आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीर ताब्यात ठेवल्याचा आणि कुटुंबीयांना धमकावल्याचा अतिरिक्त गुन्हा दाखल आहे. 17 मे रोजी वैष्णवीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर जुलै महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सविस्तर आरोपपत्र न्यायालयात सादर केले.
वैष्णवी आणि शशांक यांचा 28 एप्रिल 2023 रोजी प्रेमविवाह (death case) झाला होता. लग्नावेळी शशांकने गाडीची मागणी केल्याचा आरोप आहे. विवाहानंतरही हुंड्यासाठी आणि इतर कारणांवरून वैष्णवीचा छळ होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. छळाला कंटाळून तिने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावाही करण्यात आला असून ते प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप आहे. अखेर सातत्याने होत असलेल्या छळामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.
दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी निलेश चव्हाणला (death case) नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे वैष्णवीचे मूल असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आता न्यायालयीन सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि सादर होणारे पुरावे यावर या खटल्याचा निकाल अवलंबून राहणार आहे. वैष्णवीला न्याय मिळावा, ही राज्यभरातील नागरिकांची भावना असून न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?
या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार