भय इथले संपत नाही, आजही मुलींना घराबाहेर पडताना भीती वाटतंय.(kidnapped) पालकांमध्येही मुलींबाबतीत आजही मनात चिंता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एका 15 वर्षीय मुलीचं दिवसाढवळा अपहरण करण्यात आलं. धक्कादायक म्हणजे या प्रकरणाला लव्ह जिहादचा अँगल जोडला जात असल्याने जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही 13 फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे कॉलेजला जाते म्हणून घरातून निघाली. संध्याकाळी ती कॉलेजमधून परत येते. पण त्यादिवशी संध्याकाळी नेहमीची वेळ निघून गेली तरी ती घरी आली नाही. पालकांची चिंता वाढत होती, त्यांनी मुलीचा शोध सुरु केला. पण तिचा काही थांगपत्ता लागला नाही. अशातच त्यांनी तातडीने राहुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध सुरु केल्यावर धक्कादायक बाब समोर आली की, तिचं भरदिवसा रस्त्यावरून तिचं काही नराधमाने अपहरण केलं. यामाहितीनंतर पोलिसांची शोध मोहीम सुरु झाली.

सीसीटीव्ही फुटेज , मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीचा (kidnapped)आधार घेत तिला पोलिसांकडून शोध मोहीम सुरु होती. यासगळ्याचा आधारावर त्या मुलीला नाशिक – सुरत रोडवरील रामशेज किल्ला परिसरातील घनदाट जंगलात असल्याची माहिती मिळाली. तातडीने पोलिसांचे पथक जंगलात तिच्या शोधण्यासाठी गेलं असता, मुलीला तिथे डांबून ठेवण्यात आल्याच उघड झालं. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तिची सुटका केली आणि तीन नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
पीडित मुलीने सुटकेनंतर पोलिसांना सांगितलं की, तिच्यावर जंगलात पाच दिवस(kidnapped) नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणात मुक्तार हैदर पठाण (मुख्य आरोपी), कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींवर POCSO Act तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.दरम्यान पुण्यातही धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. विधवा आईच्या मित्राने तिच्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. मुलीला शाळेत सोडून देतो असं सांगून मित्र त्या मुलीला गाडीवरुन घेऊन गेला. नंतर भर रस्त्यात गाडी थांबवून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत