अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे असलेल्या साईबाबा मंदिर शिर्डी परिसरात (Sai Baba temple) भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा शिर्डी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. देशभरातून तसेच विदेशातून दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. या गर्दीचा फायदा घेत आंध्र प्रदेशातून आलेली एक टोळी मंदिर परिसरात सक्रिय असल्याचे उघड झाले आहे.

एका भाविकाची पर्स ब्लेडने कापून त्यातील रक्कम (Sai Baba temple) चोरल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान काही महिला आणि पुरुष संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. विशेष म्हणजे ही टोळी दर अर्ध्या तासाने कपडे बदलून गर्दीत पुन्हा मिसळत होती. सुरुवातीला पंजाबी ड्रेसमध्ये दिसलेल्या महिलांनी नंतर साडी परिधान करून पुन्हा परिसरात वावर केल्याचे फुटेजमध्ये स्पष्ट झाले. या वेशांतराच्या माध्यमातून पोलिस व सुरक्षा रक्षकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले असता एक आरोपी पळून (Sai Baba temple) जाण्यात यशस्वी झाला. मात्र दोन महिला, एक पुरुष आणि एका अल्पवयीन बालकाला अटक करण्यात आली. आरोपींकडून १० महागडे मोबाइल फोन, १,१७० रुपये रोख रक्कम, ब्लेड्स आणि कटर जप्त करण्यात आले. अल्पवयीन बालकाकडूनही एक मोबाइल हस्तगत करण्यात आला असून त्याला तातडीने चिल्ड्रन होममध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न (Sai Baba temple) पुन्हा ऐरणीवर आला आहे. आधीच परप्रांतीय भिक्षेकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना आता चोरट्यांच्या टोळ्याही सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आणि मंदिर प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत