मुंबई न्यायालयाने एका 9 वर्षे जुन्या छेडछाडीच्या प्रकरणात आरोपीला 3 वर्षांची शिक्षा सुनावली.(flying)आरोपीने एका हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात 16 वर्षांच्या मुलीला फ्लाईंग किस दिला होता. त्याची ही कृती त्याला चांगलीच महागात पडली आहे. पीडितेच्या म्हणण्यांनुसार, आरोपीने त्या दिवशी तिचा पाठलाग केला. इतकेच नाही तर त्याने तिचा हात धरला आणि तिला मागे ओढले. समज देऊनही त्याने तिला फ्लाईंग किस दिला. कुटुंबाच्या तक्रारीनंतर हे प्रकरण न्यायालयात पोहचले. दीर्घकाळ हा खटला सुरू होता. आता विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. आरोपीला 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

हे प्रकरण मुंबईतील आहे. एका छोटेखानी हळदी-कुंकवाच्या (flying)कार्यक्रमाला या घटनेने गालबोट लागले होते. 2017 मध्ये हा कार्यक्रम सुरू असताना 16 वर्षीय पीडितेला तिच्याच शेजारील आरोपीने त्रास दिला. तिचा हात ओढला. तिला फ्लाईंग किस दिला. त्यावेळी आरोपी हा 19 वर्षांचा होता. मुलीने आरोपीला समज दिली. पण तो बधला नाही. तेव्हा मुलीने भीतभीतच ही माहिती कुटुंबाला सांगितली. या घटनेने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला. तरुणाविरोधात तक्रार देण्यात आली. प्रकरण कोर्टात पोहचले.
फ्लाईंग किस देण्यापूर्वी सुद्धा या मुलाने पीडितेला अनेकदा त्रास दिला होता.(flying) जेव्हा ती शिकवणीला जायची, तो पाठलाग करायचा. तो तिचा हात धरायचा आणि त्याच्याकडे ओढण्याचा, तिला बिलगण्याचा प्रयत्न करायचा. या घटनाक्रमाने मुलगी अगोदरच भीतीत होती. तर हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात मुलाने पुन्हा तसेच कृत्य केले आणि तिला फ्लाईंग किस केला. या घटनेने तिला मोठा धक्का बसला. तिने कुटुंबाला ही माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी मुलाला आणि त्याच्या आईला बोलवले. ही घटना सांगितली. तेव्हा मुलाच्या आई-वडिलांनी मुलीसह तिच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की आरोप नाचत असताना त्याने फ्लाईंग किसचा इशारा केला. त्याचे तिला छळण्याचा अथवा इतर हेतू नव्हता. तर पीडितेच्या वकिलांनी हा दावा खोडून काढत आरोपी कसा त्रास देत होता, याचा युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने फ्लाईंग किस देणे हा तर लैंगिक छळ असल्याचे मते नोंदवत आरोपीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. आरोपीला प्रकरणात 3,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत