आपण अनेकदा मोठ्या हॉटेलमध्ये, मॉलमध्ये, रेल्वे स्टेशनवर किंवा (railway station) विमानतळावर जातो आणि तिथे वॉशरूमच्या दारावर मोठ्या अक्षरांत लिहिलेलं “WC” पाहतो. अनेकांच्या नजरेतून हा शब्द दररोज जातो, पण त्याचा नेमका अर्थ काय असतो याचा विचार फार कमी जण करतात. WC हे फक्त एक संक्षिप्त रूप नाही, तर त्यामागे इतिहास दडलेला आहे.

WC चा पूर्ण अर्थ “वॉटर क्लोझेट” असा होतो. हा शब्द 19 व्या शतकात (railway station) प्रचलित झाला. त्या काळात आधुनिक प्लंबिंग प्रणालीचा विकास सुरू होता. घरामध्ये किंवा इमारतीमध्ये पाण्याच्या सहाय्याने फ्लशिंग सिस्टम असलेली स्वतंत्र, बंद आणि खासगी खोली तयार करण्याची संकल्पना नवीन होती. अशा खोलीला “वॉटर क्लोझेट” म्हटलं जाऊ लागलं. म्हणजेच पाण्याच्या सोयीसह असलेली शौचालयाची खासगी जागा. पुढे हा शब्द लहान करून WC असा वापरला जाऊ लागला आणि आजही सार्वजनिक ठिकाणी तोच संकेत म्हणून वापरला जातो.

दरम्यान, बाथरूम आणि वॉशरूम या शब्दांबाबतही अनेकदा संभ्रम निर्माण (railway station) होतो. दोन्ही शब्दांचा संबंध स्वच्छतेशी असला तरी त्यांच्या वापरात थोडा फरक आहे. बाथरूम म्हणजे अशी खोली जिथे आंघोळीची सोय असते. घरामध्ये किंवा हॉटेलमध्ये असलेली जागा, जिथे शॉवर, बाथटब किंवा बादलीने आंघोळ करण्याची सुविधा असते, तिला बाथरूम म्हटलं जातं. वॉशरूम हा शब्द प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी वापरला जातो. मॉल, ऑफिस, रेल्वे स्टेशन, बसस्थानक किंवा विमानतळावर असलेल्या स्वच्छतागृहांना वॉशरूम म्हणण्याची पद्धत रूढ झाली आहे. कॅनडासारख्या देशांत हा शब्द सर्वसाधारणपणे वापरला जातो.

भारतामध्येही सार्वजनिक ठिकाणी “वॉशरूम” हा शब्द अधिक (railway station) प्रचलित झाला असला तरी अनेक ठिकाणी WC हीच ओळख कायम आहे. दररोज आपण या पाट्या पाहतो, पण त्यामागील अर्थ आणि इतिहास माहित नसतो. साध्या वाटणाऱ्या या दोन अक्षरांमध्ये आधुनिक स्वच्छता व्यवस्थेचा एक महत्त्वाचा टप्पा दडलेला आहे. पुढच्या वेळी तुम्ही एखाद्या वॉशरूमच्या दारावर WC लिहिलेलं पाहाल, तेव्हा त्यामागची ही रंजक कहाणी नक्की आठवा.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?