टी20 वर्ल्डकप 2026 मधील सुपर 8 फेरीत भारताचा पहिलाच सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार (Super 8) असून क्रिकेटविश्वाचे लक्ष या हायव्होल्टेज लढतीकडे लागले आहे. साखळी फेरीत दोन्ही संघांनी अपराजित राहून दमदार कामगिरी केली आहे, त्यामुळे ही झुंज अतितटीची होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे गतविजेता म्हणून भारतीय संघावर अपेक्षांचे ओझे अधिक असल्याची प्रतिक्रिया दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी दिली आहे.

सराव सत्रादरम्यान माध्यमांशी बोलताना कॉनराड यांनी सांगितले की, दोन्ही (Super 8) संघांवर दबाव असला तरी चॅम्पियन असलेल्या भारतावर तो अधिक असेल. उपांत्य आणि अंतिम फेरी गाठण्याची अपेक्षा भारतीय संघाकडून केली जात आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या खेळावर होऊ शकतो, असे ते म्हणाले. दबावाखालील परिस्थितीचा फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, मात्र भारत कमकुवत संघ नाही याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.कॉनराड यांनी अप्रत्यक्षपणे भारतीय संघातील एका फलंदाजाच्या अलीकडील अपयशाकडेही लक्ष वेधले. सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झालेल्या खेळाडूवर किती दबाव असेल, याची कल्पना सर्वांनाच आहे, असे वक्तव्य करत त्यांनी संघनिवडीवरील ताणाबाबत सूचक भाष्य केले. त्यामुळे भारताच्या फलंदाजीची कसोटी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भारतीय (Super 8) संघाकडून इशान किशन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रभावी कामगिरी केली असली तरी इतर खेळाडूंना अद्याप सातत्य दाखवावे लागणार आहे. सुपर 8 फेरीतील तिन्ही सामने जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. अन्यथा उपांत्य फेरीचे गणित गुंतागुंतीचे होऊ शकते.या गटातील सर्व संघ साखळी फेरीत अपराजित राहिले असल्याने स्पर्धेची चुरस वाढली आहे. आत्मविश्वासाने भरलेल्या संघांमध्ये होणाऱ्या या सामन्यात कोण वरचढ ठरणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. पहिल्याच सामन्यात विजय मिळवून गटात आघाडी घेण्याचा निर्धार दोन्ही संघांनी केला असून मैदानावरील लढत रोमांचक होणार, यात शंका नाही.

हेही वाचा :

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा यांच्या उदयपूरमधील लग्नाच्या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे किती? किंमत ऐकून…

स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट

‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत