टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाचा घटस्फोट झाला आहे.(divorced) क्रिकेटर राहुल चहरने घटस्फोटाची घोषणा केली आहे. त्याने सोशल मिडिया पोस्टद्वारे ही बातमी शेअर केली आहे. २६ वर्षीय राहुलने पत्नी इशानी जोहरपासून घटस्फोट घेतला आहे.राहुल चहरने सोशल मिडिया पोस्टद्वारे घटस्फोटाची महिती दिली आहे. त्याने पोस्टमध्ये म्हटलंय की, मी स्वतःला, माझे मूल्य किंवा मला हवे असलेले आयुष्य समजून घेण्यापूर्वीच माझे लग्न झाले. त्यानंतर अनेक वर्ष मला खूप काही शिकायला मिळाले ज्याची मी कधीही अपेक्षा केली नव्हत. गेली १५ महिने मी न्यायालयात जात होतो. जिथे मला संयम, धैर्य शिकायला मिळाले.

आज माझ्या आयष्यातला मी तो अध्याय संपवत आहे. (divorced)योग्य कायदेशीरप्रक्रियेनंतर हा निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्यातील हा टप्पा संपवून त्याची मोठी किंमत मोजावी लागते. मी हा अध्याय रागाने की पश्चात्तापाने नाही तर स्पष्टतेने संपवत आहे. काही नातील कायम टिकण्यासाठी नसतात ती आपल्याला जागृत करण्यासाठी, शिकवण्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी असतात. मी अधिक समजुतदारपणाने आणि आत्मविश्वासाने पुढे जात आहे. हा शेवट नाही तर नवीन सुरुवात आहे, असं राहुलने म्हटलं आहे.
राहुल चहरने ईशानीशी डिसेंबर २०१९मध्ये लग्न केले होते.(divorced)कोरोनाव्हायरसमुळे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. लग्नानंतर अवघ्या चार वर्षातच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.राहुल चहरने भारतासाठी अनेक सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय टी-२० आंतरराष्ट्रीय सामान्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. राहुल याआधी रायझिंग पुणे सुपर जायंट्, मुंबई इंडियन्सकडून खेळला होता.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत