राज्यात हिवाळ्याची चाहूल पूर्णपणे ओसरली असून फेब्रुवारी महिन्यातच (warning)उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. बहुतांश भागांत दुपारच्या सत्रात कडक ऊन पडत असून तापमान झपाट्याने वाढले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात प्रामुख्याने कोरडे वातावरण राहणार असले, तरी काही जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. परिणामी, अनेक शहरांमध्ये कमाल तापमान 30 अंशांच्या पुढे गेले असून काही ठिकाणी ते 35 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार किमान आणि कमाल तापमानात (warning)आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेचा प्रभाव जास्त असून अनेक ठिकाणी पारा 35 अंशांच्या पुढे सरकला आहे. मध्यम आणि उच्च स्तरावर ढगांची निर्मिती झाल्याने रात्रीचे तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहत आहे.पुण्यात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात शहरात सरासरी 14.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली असून 2014 नंतरची ही तिसरी उच्चांकी नोंद ठरली आहे. इतिहासात पाहता, 4 फेब्रुवारी 1967 रोजी 35.8 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर 1954 मध्ये 35 अंश आणि 2012 मध्ये 34.9 अंश सेल्सिअस अशी नोंद झाली होती. सध्या पुणे आणि आसपासच्या भागांत सकाळच्या वेळी धुक्याचे प्रमाण वाढले असले, तरी दुपारी आकाश बहुतांश स्वच्छ राहते.
विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.(warning) त्याखालोखाल अमरावतीमध्ये 35.2, अकोल्यात 35.1, चंद्रपूरमध्ये 33.6 आणि बुलढाण्यात 33.3 अंश सेल्सिअस तापमान राहिले. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातही उष्णतेची तीव्रता वाढलेली दिसून आली. पुणे आणि परभणीत 32.7 अंश कोल्हापूरमध्ये 32.2 , नाशिकमध्ये 32 तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 31.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण किनारपट्टीवर तुलनेने कमी तापमान राहिले असून मुंबईत 28.4 आणि अलिबागमध्ये 27.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले.
दरम्यान, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये काही (warning) ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नाशिक, जळगाव तसेच पुणे जिल्ह्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहू शकते. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या सर्व विभागांत दिवस व रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली