जुलै महिन्यात 12 दिवस बँका बंद राहणार नेमक्या कोणत्या दिवशी सुट्टी राहणार?

भारतातील विविध राज्यातील सर्व बँका जुलै महिन्यात 12 दिवस बंद राहणार आहेत. सुट्ट्यांची माहिती जाणून घेऊयात.

भारतातील विविध राज्यातील बँका जुलै महिन्यात 12 दिवस बंद राहणार आहेत. जुलै महिन्यात 4 रविवार आणि 2 शनिवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त सणामुळे 6 दिवस बँकांना सुट्टी राहील. जुलै महिना हा सर्वाधिक कमी सुट्टी असणारा महिना आहे. देशातील कोणत्या राज्यात किती दिवस बँका बंद राहणार, जाणून घेऊयात.जुलै महिन्यात 5, 12, 19 आणि 26 तारखेला रविवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहतील. या व्यतिरिक्त 11 जुलै रोजी महिन्याचा पहिला शनिवार आणि 25 एप्रिल रोजी महिन्याचा चौथा शनिवार आहे, (holidays) त्यामुळे देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यातील सण आणि स्थानिक उत्सवानुसार 6,9, 16,17,18 आणि 22 जुलै रोजी बंका बंद राहतील.

6 जुलै मिझोरममध्ये MHIP Day निमित्त तेथील सर्व बँक बंद राहतील. मिझोरममध्ये 1974 साली महिलांसाठी (MHIP) एनजीओची स्थापना झाली होती. ही राज्यातील महिलांसाठीची सर्वात मोठी एनजीओ आहे.

9 जुलै मेघालयात Beh Deinkhlam हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. (holidays) त्यामळे या दिवशी मेघालयमध्ये सर्व बँक बंद राहीतल. Beh Deinkhlam हा सण मेघालयातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सणापैकी एक आहे. हा सण विशेषत: जैंतिया किंवा पनार समाजाकडून साजरा केला जातो.

16 जुलै ओडिशामध्ये रथ यात्रा, उत्तराखंडमध्ये हरेला आणि मणिपूरमध्ये कांग सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व बँका बंद राहतील.

17 जुलै क्रांतिकारक यू तिरोत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेघालयात सर्व बँका बंद राहतील.

18 जुलै सिक्किममध्ये Drukpa Tshe-zi सणानिमित्त सर्व बँका बंद राहतील. हा सण बौद्ध धर्मीय व्यक्ती मोठ्या प्रमाणात साजरा करतात. या सणाच्या पार्श्वभूमीवर सिक्किममध्ये सर्व बँका बंद राहतील.

तत्पूर्वी, सदर सुट्य्यांचा तारखा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार आहेत. (holidays) तसेच इतर राज्यांमध्ये तेथील स्थानिक सणांनुसार अतिरिक्त सुट्ट्या जाहीर केल्या जाऊ शकतात. महिन्याला एकूण १२ दिवस बँका बंद राहणार असल्याने बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बँका बंद असल्यातरी ग्राहक नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, युपीआय आणि एटीएम यांसारख्या डिजिटल सुविधा २४ तास सुरू राहतील.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?