लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरानं त्रस्त असणाऱ्या अनेक (government) पालकांसाठी ही आनंदाची बातमीये. कारण आता भारतात 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी आणण्याची सरकारनं पुरेपुर तयारी केल्याचं कळतंय. त्यासाठी इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी नियम 2021 मध्ये सुधारणा करुन ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मिडीया वापरावर बंदी येण्याची शक्यता आहे. यासंदर्भातच इकॉनॉमिक सर्व्हे 2025–26 मध्ये लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरासंबंधी काही सुचना करण्यात आल्या होत्या.. काय होत्या त्या सुचना पाहा.

इकॉनॉमिक सर्व्हेत सूचना
गॅम्बलिंग अॅप्स वय-आधारित (government)मर्यादा असाव्यात
ऑटो-प्ले फीचर्स
टार्गेटेड जाहिराती
मुलांच्या हिताचा निर्णय
मुलांचे मानसिक आरोग्य
व्यसन
सायबरबुलिंग
अश्लील कंटेंट
डीपफेक

यासारख्या समस्या टाळण्यासाठी केंद्रांचं हे पाऊल अत्यंत महत्वाचं ठरु शकतं.(government) याआधी ऑस्ट्रेलिया, फ्रान्समध्ये 15-16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध आणण्यात आलेत. त्यामुळे हा निर्णय लागू झाला तर लहानग्यांसाठी निर्णय घेणारा भारत हा जगात तिसरा देश ठरेल. या निर्णयांची अंमलबजावणी अत्यंत कठीण असली तरी हा निर्णय मुलांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी हिताचा मानला जाऊ शकतो, कारण 15 दिवसांपूर्वी युपीतील गाजियाबादमध्ये ३ सख्या बहिणींनी ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन केलेली आत्महत्या ही सोशल मीडिया लहानग्यांच्या गळ्यातील कसा फास ठरतोय हे सांगण्यास पुरेशी आहे. त्यामुळे हा निर्णय कधी अंमलात येतोय. ते पाहणं आता महत्वाचं ठरेल.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं