हळूहळू थंडीचा जोर ओसरत असतानाच देशभरातील हवामानात मोठे बदल (major changes) दिसू लागले आहेत. तापमानात वाढ होत असल्याने अनेक भागांत उन्हाळ्याची चाहूल लागली आहे; मात्र त्याचवेळी पावसाचीही शक्यता निर्माण झाली आहे. भारत मौसम विज्ञान विभाग (IMD) यांनी देशातील नऊ राज्यांसाठी पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस या राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील १६ तासांत काही (major changes) राज्यांत पावसाची सुरुवात होऊ शकते. या कालावधीत वाऱ्यांचा वेगही वाढण्याची शक्यता असून ताशी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे काही भागांत वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, (major changes) अंदमान-निकोबार बेटे, छत्तीसगड, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये २३ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पावसाबरोबरच बर्फवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ताशी ३५ ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, गुजरात आणि महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवसांत (major changes) तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते, तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे उन्हाळ्याची चाहूल लागत असताना दुसरीकडे पावसाचा अंदाज व्यक्त झाल्याने हवामानातील हा बदल नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
हेही वाचा :
अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?
टीम इंडियाचा पहिला पराभव, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी संधी गमावली, काय झालं?
एपस्टीन फाइल्स प्रकरणात सर्वात मोठी अटक! या दिग्गजावर कारवाई होताच जगात खळबळ