कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

साधारणतः 45 वर्षांपूर्वी घरामध्ये छताचा पंखा असणे टेबल पंखा असणे (starting) हे श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे. आता पंखा असणे ही प्रत्येकाची गरज बनली आहे. झोपडी मध्ये पंखा असणे ही बाब नवलाईची राहिलेली नाही. याचा अर्थ गेल्या चार दशकात तापमान हळूहळू वाढत गेले आहे आणि आता 35 च्या पुढचे तापमान सर्वसाधारण मानले गेले आहे. पृथ्वीवरचे तापमान वाढण्यास सुरुवात झाली ते इसवी सन 1857 च्या आसपास. त्यानंतरच्या प्रत्येक दशकात पॉईंट 11 प्रमाण वाढत गेले. इसवी सन 1982 मध्ये तापमान वाढीचा वेग विलक्षण होता. आधीच्या तुलनेत तो तिप्पट होता. हवामान शास्त्रज्ञ असे सांगतात की 2050 पर्यंत तापमान 1.5 ने वाढणार आहे. म्हणजे आणखी 25 वर्षांनी 40 तपमान हे गृहीत धरले जाणार आहे.यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचे चटके बसू लागले. फेब्रुवारी महिन्यात इतके तापमान गृहीत धरलेले नसते. गेल्यापन्नास वर्षात फेब्रुवारी महिना तापलेला नव्हता. मार्च महिन्यात अंगाची लाही लाही होऊ लागली. यंदाच्या भीषण उन्हाळ्याची मार्चमध्ये मिळालेली ही पूर्व सूचना समजली जाते.

दिल्ली सह मध्य व उत्तर पश्चिम भारतात सध्या तापमान 35 इतके आहे. (starting)मे महिन्यात ते 44 पर्यंत जाईल. उत्तर पश्चिम आणि द्विकल्पीय भारतात साधारण तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद व्हायला फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरे इथे सध्या 38 तापमान आहे. हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होणार आहेत. म्हणूनच दुपारी मला ते सायंकाळी चार पर्यंत काम असेल तरच बाहेर पडावे. उष्णता रोधक उपाय योजना कराव्यात. रक्तातील पाणी कमी होणार नाही याची खबरदारी घेतली जावी. भरपूर पाणी प्यावे, लिंबू सरबत घ्यावे, नारळाचे पाणी प्यावे. सुती आणि पांढरे कपडे परिधान करावेत असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.उष्णतेच्या लाटेमुळे शेती उत्पादन आणि उत्पादन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होणार आहेत. वाढत्या आद्रतेने उष्माघात शक्य आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागात उष्णता वाढली आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान,उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथील तापमान उर्वरित भारतापेक्षा अधिक असणार आहे. 2025 मध्ये जसे हवामान होते तसेच हवामान यावर्षी सुद्धा आहे.

गतवर्षी पावसाचा मुक्काम चांगला सहा महिन्यापर्यंत होता. थंडीचा कडाका सुद्धा मोठा होता.(starting) त्यामुळे यंदा उन्हाचा दणका सुद्धा मोठा असणार आहेआणि हवामान शास्त्रज्ञांनी तसे स्पष्ट सुद्धा केलेलेआहे. जागतिक हवामान आणि त्यामध्ये होत गेलेले बदल याबद्दलची हवामान तज्ञांची निरीक्षणे चिंता व्यक्त करणारी आहेत. जानेवारी महिन्यात मुंबईत जागतिक पर्यावरण परिषद संपन्न झाली. या परिषदेमध्ये 35 देशांचे पर्यावरणवादी सहभागी झाले होते. या परिषदेत पर्यावरण या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. भारतातील हवामान हे पश्चिम घाटावर अवलंबित आहे. पश्चिम घाटाचा जागतिक पर्यावरण राखण्यामध्ये मोठा भाग आहे. पश्चिम घाट पर्वतीय मालिका भारतातून जाते.पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हवामानावर झालेला आहे. यंदाचा उन्हाचा वाढलेला आलेख हा त्याचाच परिपाक आहे. एकूणच गेल्या 50 वर्षात पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, झालेला आहे आणि म्हणूनच उन्हाच्या झळा वाढू लागले आहेत आणि वाढणार आहेत.

पर्यावरणीय वातावरणात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि आजही तो होताना दिसतो आहे. महाराष्ट्राचेच उदाहरण घेताना, महाराष्ट्रात चार पदरी, आठ पदरी महामार्ग बांधले गेले. दळण वळण विकासासाठी ते आवश्यक असले तरी करोडो झाडांची कत्तल झालेली आहे. कमीत कमी झाडांची कत्तल व्हावी असे नवीन रस्ते बांधणी करताना धोरण आखले गेले नाही. रस्त्याच्या आड येत असणारी झाडे काढून टाका असा मुक्त परवानाच शासनाने दिल्यामुळे करोडो झाडांची कत्तल झाली आणि त्या बदल्यात कंत्राटदारावर एकास पाच झाडे लावण्याचे बंधन असतानाही ते कागदोपत्री दाखवले गेले. राज्य शासनाची शतकोटी वृक्ष लागवड ही योजना ही अशाच प्रकारे जमिनीवर कमी आणि कागदावर जास्त राबवली गेली.

हेही वाचा :

सावधान! पुढचे २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; ‘या’ ७ जिल्ह्यांना हायअलर्ट जारी!

घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याने मुलाला दिले ‘इतक्या’ कोटींचे गिफ्ट; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्री 6 मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प