कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
शेजारच्या राष्ट्रांमध्ये राजकीय स्थैर्य नसेल तर त्याचे प्रतिकूल परिणाम काय होतात (stability) हे भारताने यापूर्वी अनुभवले आहे. आता बांगलादेश पाठोपाठ भारता नजीकच्या नेपाळमध्ये सत्तांतर झाले आहे. एका भल्या मोठ्या जन आंदोलनानंतर, अराजक सदृश्य स्थिती नंतर या दोन्ही राष्ट्रांमध्ये सत्तांतर होऊन तेथील सर्वसामान्य जनतेने नव्या उमेदीच्या नेतृत्वाकडे राष्ट्राची सूत्रे सोपवली आहेत. बालेन शहा हे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून नेपाळची सूत्रे लवकरच हाती घेतील.नेपाळमधील सत्तांतराचे भारतावर किती सकारात्मक परिणाम होणार आहेत हे नजीकच्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होईल.स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेजारच्या पाकिस्तान मध्ये राजकीय स्थैर्य जे होते आणि आहे ते तेथील लष्करामुळे.त्याचा त्रास भारताला तेव्हापासून आजपर्यंत होत आला आहे. बांगलादेशात जिया उर रहमान यांची सत्ता उलथून टाकल्यानंतर तेथे शेख हसीना यांच्या आवामी पार्टीचे सरकार जवळपास 18 वर्षे होते. तेथे राजकीय स्थैर्य होते आणि म्हणूनच बांगलादेशाशी भारताचे द्विपक्षीय संबंध अतिशय चांगले होते. तेथील विद्यार्थी आंदोलनामुळे शेख हसीना यांच्या सत्तेला सुरुंग लागला होता.

अगदी महिन्यात दीड महिन्यापूर्वी तेथे खलिदा जिया यांचे सुपुत्र तारीक(stability)रहमान यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आहे. शेख हसीना या भारतामध्ये राजकीय आश्रयाला आहेत आणि त्यामुळे बांगलादेशाशी भारताचे फार मधुर संबंध निर्माण होतील असे नाही. पण तेथे राजकीय स्थैर्य आले आहे. काही महिन्यापूर्वी नेपाळमध्ये के पी शर्मा उर्फ ओली यांच्या सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर तेथील युवा पिढीने रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन सुरू केले. नेपाळचा गृहमंत्री अर्धनग्न अवस्थेत काठमांडूच्या रस्त्यावरून सैरावैरा पळत होता हे दृश्य जगाने पाहिले.यावरून तेथील कोटक परिस्थिती किती होती त्याचे दर्शन घडते. नेपाळमध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला होता. तेथील सत्ताधाऱ्यांनी राजप्रसाद उभा केले होते. त्यांची मुले परदेशात उच्च शिक्षण घेत होती. राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांची चंगळवादी संस्कृती सर्वसामान्य जनतेसमोर आली होती.
त्याचा एकत्रित परिणाम होऊन तेथील के पी ओली सरकारला सत्तेतून काय उतार व्हावे लागले होते. दिनांक पाच मार्च रोजी तेथील संसदेसाठी सार्वत्रिक मतदान झाले. 275 सदस्य संख्या असलेल्या संसदेसाठी 165 जागा थेट जनतेतून निवडावयाच्या होत्या तर 110 जागा प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीने भरल्या जाणार आहेत.
बालेन शहा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने अर्थात आर एस पी ने (stability) नेपाळच्या संसदेमध्ये निर्विवाद बहुमत मिळवले आहे. विशेष म्हणजे चार वेळा पंतप्रधान झालेल्या के पी ओली यांचा बालेन शहा यांनी प्रचंड मताधिक्याने पराभव केला आहे. काठमांडू या राजधानीतील दहा जागा आर एस पी ने जिंकलेल्या आहेत.नेपाळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय स्थिरता नव्हती. गेल्या 18 वर्षात तेथे 14 सरकारे सत्तेवर आली होती. यावरून तेथील राजकीय अस्थिरता लक्षात येईल. काठमांडू शहराचे महापौर पद भूषवलेल्या हे इंजिनियर आहेत. पण त्यांची रॅप स्टार म्हणून, गीतकार म्हणून देशभर ओळख आहे.
नेपाळच्या झेन झी म्हणजे तरुण पिढीने बालेन शहा यांना आपला आश्वासक नेता म्हणून निवडलेले आहे. तेथील सर्वसामान्य मतदारांनी नेपाळमधील सर्व जुन्या राजकीय पक्षांना नाकारले आहे.बालेन शहा हे नेपाळमधील मधेशी या समाजाचे आहेत. हा समाज लढाऊ म्हणून ओळखला जातो. हा समाज भारताला एक चांगला मित्र म्हणून ओळखतो. दिनांक 27 एप्रिल 1990 मध्ये जन्मलेले बालेन शहा हे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून ओळखले जातील.
भारताकडून नेपाळला63% निर्यात केली जाते. दहा ते पंधरा टक्के आयात त्या (stability) देशात चीनकडून केली जाते. भारताने नेपाळमध्ये जलविद्युत प्रकल्पामध्ये गुंतवणूक केलेली आहे. नेपाळच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात भारताचे योगदान मोठे आहे पण तरीही तेथील चीन धार्जिन सत्ताधाऱ्यांनी भारताशी सलोख्याचे संबंध निर्माण होतील असे प्रयत्न केले नव्हते. आता मात्र बालेन शहा यांनी नेपाळचे चीन बरोबरचे संबंध पूर्वीसारखे असणार नाहीत याचे संकेत दिलेले आहेत. मोठी गुंतवणूक असलेल्या आणि हिंदू संस्कृती असलेल्या भारताची त्यांचे संबंध कसे असणार आहेत हे नजीकच्या काही महिन्यात कळणार आहे.
बांगलादेशच्या तारीक रेहमान यांनी भारताची द्विपक्षीय संबंध कसे असतील हे अजूनही स्पष्ट केलेले नाही. शेजारच्या श्रीलंकेमध्ये सध्या राजकीय स्थैर्य आहे. एकूणच बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथे राजकीय स्थैर्य आहे. मात्र पाकिस्तान मध्ये राजकीय स्थैर्य नाही. सध्या तेथे जी काही लोकशाही दिसती आहे ती वरवरची असून सर्व सूत्रे फिल्ड मार्शल
असीम मुनीर यांच्याकडे आहे. आणि पाक आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध तणावग्रस्त आहेत.
हेही वाचा :
सावधान! पुढचे २४ तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे; ‘या’ ७ जिल्ह्यांना हायअलर्ट जारी!
घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याने मुलाला दिले ‘इतक्या’ कोटींचे गिफ्ट; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल
आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, मुख्यमंत्री 6 मार्चला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प