Realme कंपनीने आपला नवा बजेट स्मार्टफोन Realme P4 Lite भारतीय बाजारात लाँच केला (affordable) असून मोठी बॅटरी आणि परवडणारी किंमत हे या फोनचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. P4 सिरीजमधील हा नवीन मॉडेल विशेषतः जास्त बॅटरी बॅकअप शोधणाऱ्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे.

भारतामध्ये या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे, (affordable) ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. तर टॉप व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 11,999 रुपये मोजावे लागतील. कंपनीकडून 1,000 रुपयांचा बँक डिस्काउंट किंवा कूपन डिस्काउंटही देण्यात येत असल्याने प्रत्यक्ष किंमत आणखी कमी होऊ शकते. हा स्मार्टफोन 24 फेब्रुवारीपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
या किंमत (affordable) श्रेणीत Realme P4 Lite ची थेट टक्कर Redmi Note 14 SE 5G, POCO M7 5G, realme P3 Lite 5G आणि Samsung Galaxy F70e 5G सारख्या स्मार्टफोन्सशी होणार आहे.फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.74 इंचांचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 563 निट्स पीक ब्राइटनेस असल्यामुळे दैनंदिन वापरात स्मूद अनुभव मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे. परफॉर्मन्ससाठी ऑक्टा-कोर युनिसॉक T7250 प्रोसेसर देण्यात आला असून ग्राफिक्ससाठी माली G57 MP1 GPU आहे, ज्यामुळे मल्टीटास्किंग आणि सामान्य गेमिंग सहज शक्य होईल.
कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास, (affordable) फोनच्या मागील बाजूस 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा फोन 1080p रिझोल्यूशनमध्ये 30fps वर व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो, असा कंपनीचा दावा आहे.सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या फोनमधील 6300mAh क्षमतेची बॅटरी. 15 वॅट वायर्ड चार्जिंग सपोर्टमुळे मोठी बॅटरी असतानाही चार्जिंग तुलनेने सोयीस्कर होईल. कनेक्टिव्हिटीसाठी GPS, Wi-Fi, 4G LTE, ब्लूटूथ 5.2 आणि GLONASS यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे.
एकंदरीत, कमी बजेटमध्ये मोठी बॅटरी आणि आवश्यक फीचर्स हवे असलेल्या ग्राहकांसाठी Realme P4 Lite हा एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.
हेही वाचा :
स्मार्ट वॉच खरेदी करण्याचा विचार करताय? मग हे आहे सर्वात बेस्ट
‘प्लास्टिकमध्ये गुंडाळून जेवण’चा विचित्र ट्रेंड व्हायरल; आरोग्यावर परिणामांबाबत नेटिझन्स चिंतेत