डी-मार्टमधील महिला कॅशिअरला किती पगार असतो?

(DMart)मध्ये खरेदीसाठी जाणाऱ्या ग्राहकांना कॅश काउंटरवर मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी दिसतात. स्वस्त दरात विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या या रिटेल साखळीमध्ये ग्राहकांची सतत गर्दी असते. मात्र या महिला कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत अनेकांना उत्सुकता असते.

डी-मार्टमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे वेतन हे त्यांच्या पद, कामाचा अनुभव आणि जबाबदाऱ्यांनुसार ठरते. एंट्री-लेव्हल पदांवर काम करणाऱ्या कॅशिअर किंवा सेल्स असोसिएट महिलांना साधारणपणे महिन्याला 12 ते 14 हजार रुपये पगार दिला जातो. (DMart) यामध्ये बिलिंग, ग्राहकांना मदत करणे आणि स्टोअरमधील दैनंदिन कामे यांचा समावेश असतो.

स्टोअर स्टाफ किंवा रिटेल असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या महिलांना साधारण 10 ते 14 हजार रुपयांच्या दरम्यान वेतन मिळते. या कर्मचाऱ्यांवर वस्तू मांडणी, स्टॉक तपासणी आणि ग्राहक सेवा (DMart) यांसारख्या जबाबदाऱ्या असतात.तर थोड्या वरिष्ठ पदांवर असलेल्या सुपरवायझर किंवा सेक्शन हेड महिलांना दरमहा सुमारे 18 ते 25 हजार रुपये पगार मिळतो. या पदांवर काम करणाऱ्यांना संपूर्ण विभागाचे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांवर देखरेख आणि विक्री वाढवण्याची जबाबदारी दिली जाते. एकूणच, डी-मार्टमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध पदांनुसार वेतनाची रचना असून, अनुभव आणि कामगिरीनुसार त्यात वाढ होण्याची संधीही उपलब्ध असते.

हेही वाचा

आता मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश; मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

हादरवणारी घटना; आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कोणती?