हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील 24 तासांमध्ये कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्पामध्ये मध्यम ते अतिमुसळधार स्वरुपातील पावसाच्या(rain) सरींची हजेरी असेल असं सांगण्यात आलं आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी असेल असाही इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पावसाच्या तुरळक सरींची हजेरी असेल असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पुढचे दोन दिवस पावसाचे…
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुढचे दोन ते तीन दिवस पावसाची(rain) शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. यादरम्यान अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून, मुंबईत पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणाला पुन्हा मुसळधार पाऊस झोडपणार असून, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा व्यक्त करण्यात आला आहे. यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावल, जळगाव जिल्ह्यातील जामनेर, वाकडी, पिंपळगाव, वरखेडी, पारनेर तालुक्यातील टाकळी, पालशी, पाथर्डी आणि कारेगाव या मंडळात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.
लक्ष द्या…
मेघगर्जनेसह पावसाचा इशारा- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड , हिंगोली, नांदेड, लातूर, अमरावती, चंद्रपूर, नागपूर
मध्यम स्वरुपाचा पाऊस- मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर
अतिवृष्टीनं शेतकरी हवालदिल!
राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळx 30 जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. ज्यामध्ये राज्यातील 17 लाख 85 हजार 714 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी दिली. अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली असून उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचंही भरणे यांनी सांगितलं.
परतीच्या पावसाचा प्रवास कुठवर?
पाऊस परतीच्या वाटेला लागला असला तरीही या प्रवासातही तो धडकी भरवताना दिसत आहे. मागील 48 तासांपासून परतीच्या वाटेवर लागणारा पाऊस पश्चिम राजस्थानमधून माघार घेत मंगळवारी राजस्थानचा काही भाग, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातूनही मागे सरकल्याचं स्पष्ट होत आहे.
हेही वाचा :
अधिछात्रवृत्ती वाटपात महाज्योतीकडून दिरंगाई: विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ
PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75 वा वाढदिवस; मध्यप्रदेशात केला जाणार साजरा
मोदींचा वाढदिवस म्हणजे काळादिवस; प्रणिती शिंदेंची जीभ घसरताच भाजपनं घेतलं फैलावर