बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला(funds) असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र आजही अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

राज्यातील ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेकडून(funds)मिळणाऱ्या अधिछात्रवृत्तीच्या वितरणात दिरंगाई होत आहे. संशोधनार्थी विद्यार्थ्यांना मोठ्या आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती मंजूर केली असली तरी संस्थेने निधीअभावी २५ जुलै २०२४ पासूनच ती देण्याचा निर्णय घेतला होता.

बार्टी आणि सारथी संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला असताना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र आजही अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. संशोधनासाठी सहा महिन्यांनी मिळणारी ही रक्कम विद्यार्थ्यांचा मुख्य आधार असून, तिच्या विलंबामुळे त्यांचे संशोधनकार्य अडचणीत आले आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार, कागदपत्रे वेळेवर जमा करूनही स्टायपेंडशीट तयार होत नाही, उपयोगिता प्रमाणपत्रात सतत त्रुटी काढल्या जातात, कार्यालयाशी संपर्क साधला तरी फोन घेतला जात नाही, तर कर्मचारी उद्धट भाषेत उडवा-उडवीची उत्तरे देतात. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अलीकडेच आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत महाज्योती व्यवस्थापन व विद्यार्थी शिष्टमंडळाची बैठक घेण्यात आली होती. व्यवस्थापकांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले असले तरी, अद्यापही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.

जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत मिळणारी अधिछात्रवृत्ती आजपर्यंत केवळ २१२ विद्यार्थ्यांना मिळाली असून उर्वरित ६८८ विद्यार्थ्यांची रक्कम थांबवण्यात आली आहे. महाज्योतीच्या धोरणांमुळे संशोधनासाठी नोकरी किंवा व्यवसाय करता न येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वास्तव्य, दैनंदिन खर्च आणि संशोधनकार्य गंभीर संकटात आले आहे.

कागदपत्रे जमा करून एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी अध्याप माझ्यासारखे अनेक विदयार्थी स्टायफंडशिट दिसण्याची प्रतीक्षा करत आहेत. अधिछात्रवृत्ती खात्यात जमा होण्यापेक्षा कर्मचाऱ्यांची उद्धट भाषा विद्यार्थ्यांच्या कानावर पडत आहे हे दुर्दैवी आहे.
-अतुल मरेवाड संशोधक विदयार्थी

महाज्योती संस्थेमध्ये गेल्या एक महिन्यापासून डॉक्युमेंट्स पाठवलेले आहे.(funds) सर्व डॉक्युमेंट्स ची पूर्तता करून पाठवले असता कारणाने त्यांनी आर एस सी रिपोर्टमध्ये जोडलेला नाही. म्हणून चूक काढलेले आहे वेळोवेळी सर्व डॉक्युमेंट्स त्यांना पुरवलेल्या असतात परंतु त्यांची बोलण्याची भाषा आणि कॉल केला की उचलत नाही. उचलला तर बोलण्याची भाषा पण वेगवेगळ्या पद्धतीने असते. या कारणामुळे महाज्योती संस्थेतील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास त्याला सामोरे जावे लागत आहे. तरी कृपया शासनाने या मध्ये लक्ष घालून लवकरात लवकर आमची नोंदणी दिनांक पासून फेलोशिप अदा करावी आणि महाज्योती संस्थेतील कर्मचाऱ्यांचे बाबतीत योग्य ती कार्यवाही करून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती.

हेही वाचा :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 8 धडाकेबाज निर्णय

टीम इंडियाला मिळाला नवा जर्सी स्पॉन्सर, प्रत्येक मॅचसाठी देणार एवढे कोटी