ज्योतिषशास्त्रानुसार, राहू आणि मंगळाची सध्याची स्थिती धोकादायक षडाष्टक योग निर्माण करत आहे. खरंतर, १८ मे रोजी राहू कुंभ राशीत(rashi) प्रवेश करतो. तर मंगळ ३ एप्रिलपासून कर्क राशीत आहे. यामुळे राहू आणि मंगळ यांच्यामध्ये षडाष्टक योग तयार होत आहे. सहाव्या किंवा आठव्या घरात दोन ग्रहांच्या उपस्थितीमुळे हा योग तयार होतो. सध्या राहू आणि मंगळ यांच्यामध्येही अशीच परिस्थिती आहे. ज्योतिषाचार्य समीर मणेरीकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.

राहू आणि मंगळ या षडाष्टक योगामुळे नक्की काय घडणार आहे आणि नक्की हा योग काय असतो याबाबत आपण अधिक माहिती या लेखाद्वारे घेऊया
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या घरात असतात तेव्हा या प्रकारचे संयोजन तयार होते. याशिवाय, जेव्हा दोन ग्रहांमध्ये १५० अंशांचा फरक असतो तेव्हा देखील असे संयोजन तयार होते. या षडाष्टक योगामुळे अनेक प्रकारच्या आव्हानांना आणि समस्यांना तोंड द्यावे लागते. राहू आणि मंगळ हे दोन्ही ग्रह पापी आणि भयंकर मानले जातात. अशा परिस्थितीत, दोन भयंकर ग्रहांची युती या योगाला अधिक शक्तिशाली बनवत आहे. या षडाष्टक योगाचा सामाजिक संबंध, आर्थिक निर्णय आणि मानसिक शांतीवरही परिणाम होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, राहू-मंगळ षडाष्टक योग सिंह, धनु आणि मीन राशींवर(rashi) वाईट परिणाम करू शकतो. यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक आव्हाने येऊ शकतात, म्हणून या लोकांनी ७ जूनपर्यंत सतर्क राहावे. या राशीच्या व्यक्तींनी वागणूक आणि अन्य गोष्टीतही सावधानता बाळगावी जेणेकरून तुम्हाला या षडाष्टक योगाचा अधिक फटका बसणार नाही.
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.
हेही वाचा :
मार्केट गाजवण्यासाठी Honda Rebel 500 झाली लाँच
सांगलीतील विवाहितेने शारीरिक, मानसिक छळ केल्याने संपवले जीवन; माहेरहून पैसे आण अन्..