सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील(elections) याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या असा स्पष्ट आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका(elections) घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, ही मुदत आता संपत आली असूनही एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली नाही.

यासंदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक प्रक्रियेतील विलंबाविषयी जाब विचारला. तेव्हा राज्य सरकारने आपली बाजू मांडली असता न्यायालयाने आता राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! माजी क्रिकेटपटू युवराज सिंह ED च्या कचाट्यात

आईचे ते बोल मनाला लागले अन् 18 वर्षांच्या मुलीने संपवले जीवन, घरातील जिन्यातच….

लिफ्ट कोसळली! थरारक घटनाक्रम CCTV मध्ये कैद; लिफ्टमधल्या सहाजणांचं