पुणे शहरामध्ये एक भयानक घटना घडली आहे. सोमवारी पुण्यातील एका इमारतीमधील लिफ्ट अचानक कोसळली. या लिफ्टमध्ये(elevator) तीन महिला, दोन पुरुष आणि एक चिमुकला मुलगा असे एकूण सहाजण होते. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो चर्चेचा विषय ठरत आहे.

हा व्हिडीओ पाहून लिफ्टसंदर्भातील(elevator)सुरक्षेबद्दलचे प्रश्न उपस्थित केले जात आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तसेच कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही. मात्र अचानक लिफ्ट कोसळताना आतमध्ये काय गोंधळ उडाला हे सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
लिफ्ट(elevator) कोसळण्याची संपूर्ण घटना वाघोलीतील एका इमारतीत घडली आहे. इमारतीमधील लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे. फुटेजमध्ये लिफ्ट खाली जात असतानाच अचानक लिफ्टचा वेग वाढल्यानंतर उडालेला गोंधळ दिसून येत आहे.
अचानक सर्वजण खाली बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. लिफ्ट प्रचंड वेगाने खाली गेली आणि आदळली. मात्र हा अपघात झाला तेव्हा लिफ्ट फार उंचीवर नसल्याने कोणीही जखमी झालेलं नाही. लिफ्ट कोसळल्यानंतरही आतील सर्वजण सुरक्षित असल्याचं पाहून सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.
या सहाही जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. लिफ्ट फार उंचीवरुन न पडल्याने सर्वजण लिफ्ट वेगाने खाली जाऊ लागली तेव्हा जागेवर खाली बसले. उंची कमी असल्याने लिफ्टचा कोणताही भाग कोसळला नाही.
दरम्यान, या इमारतीमधील स्थानिकांनी अपघातासाठी बिल्डर दोषी असल्याचं म्हटलं आहे. बिल्डरने लिफ्टचं काम आणि डागडुजी योग्य पद्धतीने केलेली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. या प्रकरणात बिल्डरविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून तातडीने लिफ्टचं ऑडिट करुन घेण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
हेही वाचा :
आईचे ते बोल मनाला लागले अन् 18 वर्षांच्या मुलीने संपवले जीवन, घरातील जिन्यातच….
मोठी बातमी! माजी क्रिकेटपटू युवराज सिंह ED च्या कचाट्यात