कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : “ए के 47” आणि क्रिकेटची(cricket) बॅट एकत्र असू शकत नाहीत, असूही नयेत. पण तरीही रविवारी रात्री दुबई येथील स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना पार पडला. क्रिकेट मैदानावर बहुतांशी क्रिकेट प्रेमींनी हा सामना पाहण्यासाठी गर्दी केली नव्हती. भारतीय क्रिकेट शौकिनांनी या सामन्याकडे पाठ फिरवली होती.

नेहमीप्रमाणे भारतीय क्रिकेट संघाने या सामन्यात पाकिस्तानला चीत केले पराभूत केले. भारतीय क्रिकेट प्रेमींनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. ज्या ज्या वेळी भारतीय संघाने पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावर लोळवले त्या त्यावेळी अशा प्रकारचा होणारा जल्लोष हा एक प्रकारचा पाकिस्तान विरुद्धचा रोष असतो, निषेध असतो. रविवारी रात्री अशाच प्रकारचा निषेधात्मक जल्लोष भारतीयांनी केला.

पहेलगाम दहशतकांड झाल्यानंतर संतप्त झालेल्या केंद्र शासनाने पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेतले. सिंधू जल करार स्थगितीचा निर्णय हा त्यापैकीच एक. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असे तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले होते. चार दिवसांचे अघोषित युद्धात पाकिस्तानला लोळवल्यानंतर अद्यापही ऑपरेशन सिंदूर बंद केलेले नाही असे सांगणाऱ्या केंद्र शासनाने, क्रीडा मंत्रालयाने दुबईत होणाऱ्या क्रिकेट सामन्यात पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यास भारतीय क्रिकेट संघाला परवानगी कशी दिली याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले.

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे समर्थन करताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना” नाकी नव ‘आले होते. त्यांनी मातोश्रीवर जावेद मियादादला बाळासाहेब ठाकरे यांनी बिर्याणी खिलवली होती याची आठवण करून दिली पण ती
भारतीयांना पटली नाही. कारण तेव्हाचा काळ वेगळा होता. भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना या सामन्याचे समर्थन प्रभावीपणे कसे करायचे हेच समजेनासे झाले होते.

तरीही त्यांनी केलेले समर्थन हे लंगड्या स्वरूपाचे होते. भारतीय जनता पक्षाचे एक नेते विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मात्र क्रीडा मंत्रालयाचा हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहीत नसावा अशा आशयाची प्रतिक्रिया दिली होती. हे अनावधानाने घडलेले आहे. असे त्यांना म्हणावयाचे असावे.

तर असो! अखेर हा क्रिकेटचा सामना रविवारी दुबईच्या स्टेडियमवर खेळला गेला आणि पाकिस्तानला भारतीय संघाने दाती तृण धरायला लावले. हा सामना जिंकल्यानंतर सर्वत्र जल्लोष व्यक्त केला गेला. पण तो एका अर्थाने पाकिस्तानचा जोरदार निषेधच होता.

दुबईत खेळल्या गेलेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर करोडो रुपयांचा जुगार खेळला गेला. संजय राऊत यांनी दीड लाख कोटी रुपयांचा या सामन्याच्या माध्यमातून जुगार खेळला गेला. या क्रिकेट सामन्यातून भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला कोटी कोटी रुपये मिळाले. भारतीय क्रिकेट संघटना सुद्धा मालामाल झाली. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनाही पैसे मिळाले. अशा प्रकारची आर्थिक उलाढाल प्रत्येक सामन्यात होत असते. रविवारच्या सामन्याच्या वेळी ती नेहमीप्रमाणे झाली.

क्रिकेट सामन्यावर बेटिंग घ्यायला अनेक देशांमध्ये परवानगी आहे. तो वैध व्यवहार ठरवला गेला आहे. मात्र भारतीय संस्कृतीमध्ये जुगार निषिद्ध आहे आणि म्हणूनच भारतामध्ये बेटिंग घ्यायला परवानगी नाही किंबहुना अशा प्रकारच्या व्यवहाराला गुन्हा मानले जाते. रविवारी या सामन्यावर अब्जावधी रुपयांची उलाढाल झाली. पण भारतामध्ये हा पैसा नैतिक पातळीवर मान्य केला गेलेला नाही.

रविवारच्या सामन्यावर झालेली उलाढाल ही केवळ या दोन देशा दरम्यान झालेली नसून ती अनेक देशांमध्ये झालेली आहे. तरीही एकूणच पहलकाम दशतकांड घटनेनंतर, ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर अशा प्रकारचा सामना होता कामा नये अशी लोकभावना होती. पण रणांगणाबरोबरच खेळाच्या मैदानावर सुद्धा पाकड्यांना चारी मुंड्या चीत केले. तरीही एके फोर्टी सेवन आणि क्रिकेटची बॅट एकत्र असता कामा नये हे भारतीय क्रिकेट संघटनेने, खेळाडूंनी आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने लक्षात घेतले पाहिजे.

हेही वाचा :

उच्च विद्याविभूषितांची गुन्हेगारी!

मृत्यूचे भीषण तांडव! एक ट्रक वेगाने आला अन् असंख्य लोकांना…; Viral Video

तुमचं मुलं स्वतः अभ्यासाला बसेल, फक्त पालकांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ 3 टिप्स