कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गरिबी, बेरोजगारी, आर्थिक विषमता, विद्रोही वातावरण, शिक्षण आणि संस्काराचा अभाव याच्या एकत्रित परिणामातून गुन्हेगार घडत असतात. तथापि ही पारंपारिक कारणे आता इतिहास जमा झाली आहेत. कारण आता उच्चशिक्षितांच्याकडूनही गंभीर स्वरूपाचे गुन्हे (Crime) घडताना दिसत आहेत. वादग्रस्त आणि बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि तिच्या आई-वडिलांकडून असेच गंभीर गुन्हे घडले असल्याचे त्यांच्यावर आरोप आहे. आता तर त्यांनी एका ट्रक क्लिनरचे अपहरण केल्याचा गुन्हा पूजाचे वडील दिलीप व आई मनोरमा यांच्याविरुद्ध नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

पूजा खेडकर हिने केंद्रीय स्पर्धा परीक्षा देताना अनेक गोष्टी लपवून ठेवल्या. बनावट कागदपत्रे तयार केली. ती मूळ कागदपत्रांना जोडून ती खरी असल्याची भासली. तशी बनावट प्रतिज्ञापत्रे केली. केंद्रीय स्पर्धा परीक्षा मंडळाची अशाप्रकारे घोर फसवणूक आणि दिशाभूल केली. याबद्दल पुणे आणि दिल्ली येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. हे खळबळजनक प्रकरण उघडकीस आल्यानंतर खेडकर कुटुंब राज्यभर चर्चेत आले. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते. आणि ते 2024 ची लोकसभा निवडणूक छत्रपती संभाजी नगर मधून लढवणार होते. त्यासाठी त्यांनी राजकीय पक्षांकडे उमेदवारी मागितली होती.
पूजा खेडकर हिचे आयएएस प्रकरण गाजत असताना तिची आई मनोरमा हिने पुणे ग्रामीणमध्ये भर दिवसा भर रस्त्यावर शेतकरी कुटुंबाला धमकावण्यासाठी रिवाल्वर बाहेर काढल्या चा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या प्रकरणात त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटकही(Crime) केली होती. एका गरीब शेतकऱ्याची जमीन नाममात्र किमतीत घशात घालण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एकूणच पूजा खेडकर प्रकरणात चर्चेतून बाजूला पडत असताना क्लीनरच्या अपहरणाचे प्रकरण समोर आले आहे.
खेडकर दांपत्याकडून एका क्लिनरचे करण्यात आलेले अपहरण हे अतिशय किरकोळ कारणावरून आहे. खेडकर यांच्या आलिशान कारला अवजड वाहन घासले. त्यामुळे गाडीचे नुकसान झाले. केवळ या एका कारणावरून त्या अवजड वाहनाच्या क्लिनरचे नवी मुंबई येथून अपहरण करून त्याला पुणे येथील आपल्या आदेशानं निवासस्थानी कोंडून ठेवले. अवजड वाहनाच्या चालकाने रबाळे पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी खेडकर दांपत्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
या गुन्ह्याच्या तपासासाठी नवी मुंबईचे पोलीस पथक पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांच्या अंगावर कुत्रे सोडण्यात आले. त्यानंतर बंगल्याचे मेन गेट आतून बंद केले गेले. त्यानंतर खेडकर दांपत्य हे एका खाजगी टॅक्सीने पळून गेले. अशी एकूण या अपहरण नाट्याची घटना आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून आता आणखी एक गुन्हा खेडकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
अपहरणासारखा गंभीर गुन्हा (Crime)त्यांना टाळता आला असता, आपणाकडून एक गंभीर गुन्हा घडतो आहे हे त्यांना माहीतही आहे पण तरीही ते असे कृत्य करतात याचा अर्थ”आपले कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही”ही त्यांची मानसिकता आहे असा होतो.
पूजा खेडकर तसेच तिचे आई-वडील दिलीप आणि मनोरमा यांच्याकडून घडलेले गुन्हे हे”व्हाईट कॉलर क्रिमिनल्स”या व्याख्येत येतात. अशा प्रकारचे संशयित गुन्हेगार समाजामध्ये अगदी उजळ माथ्याने फिरत असतात आणि त्यांच्यावर समाज संशय सुद्धा घेऊ शकत नाही असे त्यांचे एकूण राहणीमान आणि वागणे असते. विशेष म्हणजे खेडकर कुटुंब हे अतिशय श्रीमंत आहे. त्यांची स्थावर मालमत्ता खूप आहे. त्यांच्याकडे जंगम मालमत्ताही आहे. अतिशय संपन्न आयुष्य जगता येईल इतकी पार्श्वभूमी असताना त्यांच्याकडून घडलेले किंवा त्यांच्यावर आरोप असलेले गुन्हे करण्याची गरजच नव्हती पण”विनाश काले बुद्धी”म्हणतात की अशी.
हेही वाचा :
‘लाडकी बहीण’ संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई!
तुमचं मुलं स्वतः अभ्यासाला बसेल, फक्त पालकांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ 3 टिप्स
मृत्यूचे भीषण तांडव! एक ट्रक वेगाने आला अन् असंख्य लोकांना…; Viral Video