इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स(DKASC), सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन आणि ‘शब्दसाधना’ या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रा. सौरभ पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

महाविद्यालयातील(DKASC) मराठी विभागाच्या वतीने ‘शब्दसाधना’ या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन आज संपन्न झाले. ‘ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि साहित्यिक जयंत नारळीकर यांचे जीवन आणि साहित्य’ यावर मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी यंदाची भित्तीपत्रिका प्रदर्शित केली. यावेळी मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटन समारंभात बोलताना बोलताना प्रा. सौरभ पाटणकर म्हणाले, ” साहित्य सामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद घेऊन येते. मराठी साहित्यात कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्यिकांचे योगदान मोठे आहे.
आनंद यादव, एकनाथ रेंदाळकर, शंकर पाटील, राजन गवस, कृष्णात खोत, आप्पासाहेब खोत यांसह अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्य विश्वात कोल्हापूरचे नाव अजरामर केले आहे. कथा, कविता, कादंबरी, नाटक अशा सर्व साहित्य प्रकारात कोल्हापुरातील साहित्यिकांनी समृद्ध लेखन केले आहे. मराठी वाङ्मयाचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या बहुतांलातील या साहित्यिकांचे साहित्य नव्याने समजून घ्यायला हवे.”
अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना प्राचार्य डॉ. एस. के. खाडे म्हणाले, ” सध्याच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली पिढी पुस्तकांच्या पानांपासून दुरावलेली आहे की काय ही भीती हळूहळू खखरी ठरत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अभ्यास करत करत साहित्याचे अफाट दालन जे ग्रंथालयांमधून आपल्याला खुणावत असते त्या पुस्तकांच्या सानिध्यात आपण राहायला हवे आणि विपुल वाचन करायला हवे.”
संस्थाप्रार्थनेने सुरू झालेल्या या समारंभाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रो. डॉ. सुभाष जाधव यांनी केले. विभाग प्रमुख प्रो. डॉ. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रोहित शिंगे आणि प्रा. भारती कोळेकर यांनी कार्यक्रमाचे भित्तिपत्रिका व वांग्मय मंडळ उद्घाटन समारंभाचे संयोजन केले. सूत्रसंचालन प्रा. भारती कोळेकर यांनी तर आभार कु. लक्ष्मी पाटील हीने मानले. मराठी विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :
उच्च विद्याविभूषितांची गुन्हेगारी!
मृत्यूचे भीषण तांडव! एक ट्रक वेगाने आला अन् असंख्य लोकांना…; Viral Video
तुमचं मुलं स्वतः अभ्यासाला बसेल, फक्त पालकांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ 3 टिप्स