छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई रागावल्याचं निमित्त आणि 18 वर्षांच्या तरुणीने थेट गळफास घेत आत्महत्या(suicide) केल्याचे समोर आले आहे. क्षुल्लक कारणावरुन तरुणीने इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने तिच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आईने अभ्यास करायला सांगितलं इतक्या कारणावरुन नर्सिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या(suicide) केली आहे. अभ्यासासाठी आई रागावल्याच्या कारणावरून एका १८ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची ही घटना वडगाव कोल्हाटी भागात घडली आहे. विशाखा अनिल वक्ते असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
विशाखा ही नर्सिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तिचे वडील एका कंपनीत काम करतात. विशाखा टीव्ही पाहत असताना तिच्या आईने तिला अभ्यास करण्यास सांगितले आणि आई स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये गेली. त्या वेळी विशाखाचा लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत होता. आईच्या या बोलण्याचा राग मनात धरून विशाखाने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्यामध्ये गळफास घेतला.
हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ विशाखाला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाखाने उचललेल्या या टोकाच्या निर्णायामुळं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अकोल्यातील शासकीय रुग्णालय परिसरात आज सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. येथे अनेक भटके लोक रात्री झोपण्यासाठी आश्रय घेत असतात. त्याच दरम्यान काल मध्यरात्री दारूच्या नशेत दोन व्यक्तींमध्ये किरकोळ वाद झाला. वाद चिघळल्याने एका व्यक्तीने दुसऱ्यावर दगडाने वार केला. यात शांताराम शिवराम गोपनारायण (रा. घुसर) या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा :
उच्च विद्याविभूषितांची गुन्हेगारी!
डीकेएएससी मध्ये मराठी वांग्मय मंडळ आणि ‘शब्दसाधना’ भित्तिपत्रिकेचे उद्घाटन संपन्न