परळी : बीड जिल्ह्यातील परळी येथून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील डाबी येथे पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत हत्या(murdered) केल्याचे समोर आले आहे. ही हत्या मध्यरात्री घडली. सकाळी घरातीक मुले उठल्यानंतर ही बाब समोर आली आहे. शोभा मुंडे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे तर तुकाराम मुंडे असं आरोपीचे नाव आहे.

तुकाराम हा फरार झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात येत आहे. दरम्यान याच तुकाराम मुंडे यांनी तीन वर्षांपूर्वी शोभा मुंडे यांना जबर मारहाण केली होती, त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, डाबी गावात पती- पत्नीच्या वादातून पत्नीची निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. तुकाराम मुंडेंने आपली पत्नी शोभा च्या पोटातील आतडे बाहेर काढून तिची हत्या(murdered) केली. शेजारच्या खोलीतील झोपलेली शोभाची दोन मुले आणि एक मुलगी झंझोपेतून उठून घरात गेली तेव्हा त्यांना त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात दिसली. हे बघून ते आरडाओरडा करू लागले तेव्हा काही मिनिटात गावकरी जमा झाले. घटनेची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून फरार तुकाराम मुंडे याचा शोध घेत आहे.

नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तुकारामला दारूचे व्यसन होते आणि यावरून त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. दोन वर्षांपूर्वी त्याने शोभाच्या डोक्यात दगड जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शोभणे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल दाखल केला होता, पण नातेवाईकांनी समजावून सांगितल्यावर तिने तो गुन्हा मागे देखील घेतला होता. पोलिसांनी आरोपी तुकाराम मुंडेंच्या शोधासाठी एक पथक पाठवले आई, या नातेवाईकांनी समजावून सांगितल्यावर तिने तो गुन्हा मागे घेतला. पोलिसांनी आरोपी तुकाराम मुंडेंच्या शोधासाठी एक पथक पाठवले आहे. या घटनेने परिसर हादरलं आहे.

बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमानुष मारहाण आणि अपहरणाचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव नागनाथ नन्नवरे असे आहे. ही घटना बांगरनाला, गोरे वस्ती येथे सायंकाळी 5.15 च्या सुमारास घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नागनाथ यांना लाठ्या- काठ्यांनी अमानुष मारहाण करून एका चारचाकी वाहनातून पळवून नेण्यात आले.

हेही वाचा :

‘दशावतार’ची तुफानी कमाई! तीन दिवसांत ४ कोटींचा टप्पा पार

आधी हस्तांदोलनाला नकार, आता भारत-पाक पुन्हा भिडणार, येत्या रविवारी महामुकाबला

सांगलीत स्पेशल-26! डॉक्टराच्या घरातून काही मिनिटांत लंपास केले कोट्यवधींचं सोनं अन् रोकड