मुंबईतील लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (tragic)प्रथमेश कदम यांचे निधन झाले आहे. काही दिवसांपासून ते आजारी होते आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, अचानक मिळालेल्या या बातमीने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.प्रथमेशच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. साधा स्वभाव, सकारात्मक ऊर्जा आणि हटके कंटेंटमुळे अल्पावधीत त्यांनी लाखो चाहत्यांची मने जिंकली होती. त्यांच्या निधनाने मराठी सोशल मीडिया विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यानंतर (tragic)कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि आपल्या आई प्रज्ञा कदम यांना मानसिक आधार दिला. गेल्या अनेक वर्षांपासून आईसोबत केलेल्या रील्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होत्या आणि त्यांच्या नात्यातील प्रेमळ संवादाने प्रेक्षकांना भावुक केले होते. प्रथमेशचा साधेपणा, प्रेमळ स्वभाव आणि डान्समधील टॅलेंट यामुळे तो सर्वांचा लाडका बनला होता. घरगुती वातावरणात तयार केलेल्या त्याच्या व्हिडिओंनी त्याला वेगळी ओळख मिळवून दिली होती.

प्रथमेशचा जवळचा मित्र तन्मय पाटेकरने इन्स्टाग्रामवर लिहिले की,(tragic) “तू सदैव आठवणीत राहशील प्रथमेश, देवाघरी स्वतःची काळजी घे रे! खूप आठवण येईल तुझी.” या पोस्टनंतर सोशल मीडियावर शोकसंदेशांचा पूर आला असून चाहते आणि मित्र प्रथमेशला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.आधी पती आणि आता मुलाचे छत्र हरपल्याने प्रथमेशच्या आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी प्रथमेशचे मित्र, चाहते आणि चाहत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत आधार व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?

राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?

२४ लाख लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद