लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही.(beloved) लाडकी बहीण योजनेत केवायसीमध्ये चुका झाल्याने महिलांचा लाभ बंद झाला आहे. दरम्यान, केवायसी करताना चुकी झाल्यामुळे महिलांना १५०० रुपये मिळाले नाहीत. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास २४ लाख महिलांनी चुकीची माहिती दिली आहे. त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.

लाडकी बहीण योजनेत जवळपास सव्वा दोन कोटी महिला लाभ घेत आहेत. (beloved) सर्व महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. त्याआधी केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ बंद केला आहे. दरम्यान, अनेक महिलांचे केवायसी केल्यानंतरही लाभ बंद करण्यात आला आहे. जवळपास २४ लाख महिलांनी केवायसीमध्ये चुक केली आहे. त्यामुळे लाभ बंद झाला आहे, याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना महिलांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.(beloved) त्यातील काही प्रश्नांची महिलांनी चुकीची माहिती लिहली होती. केवायसीमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता की, तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना? या प्रश्नावर लाखो महिलांना येस म्हणजे हो असं उत्तर लिहलं आहे.
तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत नाही ना?(beloved) या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असं लिहायचं होतं. परंतु प्रश्न नीट न समजल्याने महिलांचे उत्तर चुकले. परिणामी त्यांचा लाभ बंद झाला आहे. यामुळेच निकषात बसूनही योजनेचा लाभ बंद झाल्याची तक्रार महिला करत आहे.आता केवायसीमध्ये प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्याने लाभ बंद झाला आहे. यावर सरकारने तोडगा काढला आहे. महिलांची आता प्रत्यक्ष केवायसी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत.
हेही वाचा :
देशातील साखरेच्या उत्पादनात जोरदार उसळी, महाराष्ट्राने युपीला टाकले मागे
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली, मोठा पक्षप्रवेश