महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.(campaign) या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराचा अधिकृत प्रारंभ शनिवारी ता.३ होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होणार आहे.

प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आमदार चव्हाण यांचा हा(campaign) पहिलाच कोल्हापूर दौरा असून, त्यानिमित्ताने त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने महायुतीच्या प्रचाराला वेग येणार आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार महायुतीचे सर्व उमेदवार साडेतीन शक्तिपीठांपैकी एक (campaign)असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शहरात भव्य पदयात्रा काढण्यात येणार असून, आमदार रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून,(campaign) प्रदेशाध्यक्ष चव्हाण कोल्हापूरसाठी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करतात, याकडे सर्वांचे लक्ष असल्याचे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा :
रात्री कुत्री का रडतात? कारणं वाचून व्हा सावध
नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी
‘गिग वर्कर्स’च्या संपासमोर ‘झोमॅटो-स्विगी’ झुकले! ‘ डिलिव्हरी पार्टनर्स’चा पगार वाढला