शहर असो वा गाव, मध्यरात्री अचानक कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज अनेकांना अस्वस्थ करतो.(reasons) शांततेत घुमणारा हा आवाज केवळ त्रासदायकच नाही, तर तो काही संकेत देणारा असू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. कुत्र्यांचे रडणे म्हणजे नेहमीच अंधश्रद्धेशी जोडले जाणारे गूढ कारण नसून, त्यामागे नैसर्गिक आणि सामाजिक कारणे दडलेली असतात.रात्री कुत्र्यांची इंद्रिये अधिक तीव्रपणे काम करतात. कमी वर्दळ, शांत वातावरण आणि थंड हवामानामुळे आसपासच्या हालचाली त्यांना सहज जाणवतात. अनोळखी माणूस, वाहनांचा आवाज, इतर प्राणी किंवा एखादी संशयास्पद हालचाल जाणवली, की कुत्रे रडून किंवा ओरडून इशारा देतात. अनेक वेळा हे रडणे परिसरातील धोक्याची पूर्वसूचना ठरू शकते.

कुत्र्यांचे सामाजिक जीवनही या रडण्याशी संबंधित असते.(reasons) टोळीत राहणाऱ्या कुत्र्यांमध्ये संपर्क साधण्यासाठी विशिष्ट आवाज काढले जातात. रात्री एका कुत्र्याने आवाज दिला, की इतर कुत्रे त्याला प्रतिसाद देतात आणि हा आवाज दूरवर पसरतो. त्यामुळे एकाच कुत्र्याचा रडण्याचा आवाज संपूर्ण परिसरात गोंगाट निर्माण करतो.भूक, वेदना किंवा आजारपण हेदेखील महत्त्वाचे कारण ठरते.

जखमी किंवा आजारी कुत्रा वेदनेमुळे रडू शकतो. (reasons)तसेच, पिल्लांपासून दूर गेलेली मादी किंवा जोडीदार शोधत असलेला कुत्रा भावनिक अस्वस्थतेतून आवाज काढतो. प्रजनन काळात हा आवाज अधिक तीव्रतेने ऐकू येतो.तज्ज्ञांच्या मते, सतत आणि वेगळ्या प्रकारचे रडणे दुर्लक्षित करू नये. परिसरात एखादा अपघात, आग, चोरी किंवा इतर धोका असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा वेळी सतर्क राहणे आवश्यक आहे. कुत्र्यांचे रडणे केवळ आवाज नसून, तो निसर्गाचा आणि आसपासच्या परिस्थितीचा इशारा असू शकतो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :

प्रियांका गांधींची भावी सून अविवा बेग किती कोटींची होणार मालकीण ?

रात्री उशिरा जेवण करणं आताच थांबवा, अन्यथा पोटाच्या ५ आजारांचा धोका,

महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, सावत्र बापाचं भयंकर कृत्य