उत्तर प्रदेशमध्ये महिला पोलिसाच्या १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात (daughter)आल्याची धक्कादायक घटना घडली. सावत्र बापाने या मुलीसोबत हे संतापजनक कृत्य केले. महिला पोलिसाने या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेत नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. पीडित मुलगी शाळेमध्ये शिकते. तिची आई उत्तर प्रदेश पोलिस दलात कार्यरत आहे.

पीडित मुलगी आईसोबत भाड्याच्या घरात राहते. (daughter)या महिलेचा दुसरा नवरा देखील त्यांच्यासोबत राहतो. आरोपीने २५ डिसेंबरला पीडित मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीने शाळेतील एका मैत्रिणीला घटनेबद्दल सांगितले. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने शाळेच्या शिक्षिकेला ही गोष्ट सांगितले.

या भयंकर घटनेबद्दल ऐकून शिक्षिकेला हादरला बसला.(daughter) तिने पोलसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईला घटनेची माहिती देण्यात आली. या प्रकरणी तिने पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. काही तासांतच पोलिसांनी आरोपीला बेडया ठोकल्या. या घटनेमुळे उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत.
हेही वाचा :
Sangli : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा
खबरदार! दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, भरवा लागेल इतक्या रुपयांचा दंड
जेवताना रिल्स बघणं पडेल महागात, आत्ताच सोडा ही सवय